आ .निलेश लंके यांच्या हस्ते गुणवंत अधिकाऱ्यांचा सन्मान

पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे
नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात घवघवीत यश मिळवलेले पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थी हे राज्यातील प्रशासनात पोलीस उपनिरीक्षक व सी .ए . ची पदवी संपादीत केल्यामुळे पारनेर तालुक्याचे नाव राज्यात पोहोचविनाऱ्या या अधिकाऱ्यांचा सन्मान पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या शुभ हस्ते पारनेर येथील जनसंपर्क कार्यालयात या गुणवंत अधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांचा आमदार निलेशजी लंके साहेब यांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान केला .
आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर नाविन्यपूर्ण यश मिळवणारे सत्कारमूर्ती अधिकारी पुढील प्रमाणे .

अशोक वामन – निंबळक,ज्ञानेश्वर कांतीराम खामकर – निंबळक,अनिल सुभाष नरवडे – टाकळी खातगाव ,CA परिक्षेत कौस्तुभ काकडे – गोरेगाव, ज्ञानेश्वर बबन शिरोळे – अळकुटी , प्रियंका सुभाष कवाद – निघोज , मंदार पांडुरंग भारती – बुगेवाडी,गव्हाणे जयश्री ईश्वर – निंबळक,सुवर्णा भगवान काळे – देहरे अहमदनगर, सागर तुळशीराम लगड – कासारे, दर्शन थोरात – पिंपरी जलसेन , अजित दिवटे -रुई छत्रपती,अमोल झंझाड, वर्षा रोकडे ,शितल जासुद , सपना जपकर.
सर्व नवनिर्वाचित गुणवंत अधिकाऱ्यांना व त्यांना या पदावर पोहोचविणारे यांचे पालक हितचिंतक व सहकारी मित्रांचे आमदार निलेशजी लंके साहेब यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या .