कत्तलीसाठी गायी घेऊन जाणाऱ्यावर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बेल्हे : कत्तलीसाठी गायींसह जनावरे टेम्पोत भरून घेऊन जाणाऱ्या नऊ जणांविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पाच लाख८७ हजार रुपयांचा माल हस्तगत केला आहे.

याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी,कत्तली साठी गायी टेम्पोत भरून घेऊन जाणारे टेम्पो आळेफाटा आणि गुंळूचवाडी शिवारात पकडण्यात आले असून याप्रकरणी नऊ जणांवर महा प्राणी संरक्षण (सुधारणा) अधी १९९५ चे कलम ५(अ),५(ब),९,११,भादवी कलम ५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास,बेल्हे गुंळूचवाडी शिवारात अशोक लेल्यांड कंपनीच्या बडा दोस्त टेम्पो(क्र. एम.एच.१३,डी.क्यू.२९९९)मध्ये दोन काळ्या रंगाच्या गायी आणि ६ वासरे उस्मानाबाद येथे घेऊन जात असताना तरुण ग्रामस्थांनी पकडून आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिली. याप्रकरणी शुभम संजय दळवी यांनी आरिफ फकिर महम्मद सयद,(वय४६ वर्ष,रा.सोनई,ता.नेवासा, जि.अहमदनगर,शुभम बाबासाहेब पुंड, वय२३वर्ष,रा.माळी चिंचोरा,ता.नेवासा जि.अहमदनगर, नजिम उर्फ पापा कुरेषी(पुर्ण नाव माहित नाही),जहिर कुरेषी उर्फ बेपारी(पुर्ण नाव माहित नाही),सद्दाम बेपारी उर्फ कुरेशी,बाबु कुरेषी उर्फ बेपारी(पुर्ण नाव माहित नाही),कासिम कुरेषी उर्फ बेपारी(पुर्ण नाव माहिती नाही)सर्व रा.बेल्हे,ता.जुन्नर, नाजिम उर्फ पापा कुरेषी यांच्या विरोधात फिर्याद दिल्यानंतर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शनिवारी सकाळी सातच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा येथील माऊली हाॅस्पीटलसमोर गोवंष जनावरे ही कोणत्याही प्रकारे चारा,पाण्याची व्यवस्था न करता माजिद अमीनसाब बेपारी,वय ३१वर्ष,जमिर गुलाबनबी पिरजादे, वय २८वर्ष, दोघे रा.जुन्नर, हे त्यांच्या टाटा कंपनीचा ४०७ टेम्पो(क्र.एम.एच.४२, बी.५४४)मध्ये चाकणहून संगमनेरनजीक कुरण येथे कत्तलीसाठी माजिद अमीनसाब बेपारी, वय ३१ वर्ष,जमिर गुलाबनबी पिरजादे, वय २८वर्ष, दोघे रा.जुन्नर हे घेऊन जात असताना आढळून आले अशी फिर्याद शिवराज विष्वनाथ संगनाळे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आळेफाटा पोलीस ठाण्यात ५लाख ८७ हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विकास गोसावी आणि पोलिस नाईक पारखे करीत आहेत.