पुरवणी अर्थसंकल्पात पारनेरला २९ कोटींचा निधी-आमदार नीलेश लंके यांची माहिती

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजितदादांचे लंके यांना गिफ्ट

पारनेर(प्रतिनिधी):श्रीकांत चौरे

      राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी पारनेर-नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल २९ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. आ. नीलेश लंके यांनी ही माहिती दिली. पहिल्याच दिवशी २९ कोटींचा निधी देत अजितदादा पवार यांनी आ. नीलेश लंके यांना गिफ्ट दिले आहे. 
      अजितदादा पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी त्यांना समर्थन दिले. त्याच दिवशी पवार यांनी आ. लंके यांच्याकडे कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. लंके यांच्याकडून कामांचे प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी अर्थसंकल्पांतर्गत २९ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला. 

▪️निधी मंजुर करण्यात आलेल्या रस्त्यांची नावे पुढीलप्रमाणे

प्रमुख जिल्हा मार्ग क्र.५२ पारनेर-जामगांव, भाळवणी रस्ता कि मी ०/००० ते ६ /००, ९/५०० ते १०/५०० रस्ता सुधारणा करणे ५ कोटी, प्रमुख जिल्हा मार्ग १९५ ते नांदूरपठार ते जिल्हा हद्द रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २१९ किमी ०/०० ते ७/०० रस्ता सुधारणा करणे ४ कोटी ५० लाख, मांडवा, देसवडे, पोखरी, पिंपळगांवरोठा, अक्कलवाडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्र २८९ किमी १४ /३०० ते १५/००, २७/६००, २९/४०० रस्त्याची सुधारणा करणे २कोटी ४० लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ५० ते हिवरे कोरडा, तिखोल, पिंपळगाव तुर्क, कान्हूरपठार, पिंपळगांवरोठा, खंडोबाची वाडी, गारखिंडी ते तालुका हदद रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १९५ किमी ११/५०० ते १५ /५०० सुधारणा करणे २कोटी १० लाख, रेणवडी चोंभूत, वडनेर, निघोज, पिंपरीजलसेन, गांजीभोयरे, पानोली गटेवाडीह प्रमुख राज्य मार्ग ५ रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग १९२ किमी २४/४०० ते २८/६०० सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, प्रमुख जिल्हा मार्ग ५० ते हिवरे कोरडा, तिखोल, पिंपळगांवतुर्क, कान्हूरपठार, पिंपळगांवरोठा, खंडोबाची वाडी, गारखिंडी ते तालुका हद्द रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १९५ किमी ३४ /४०० ते ३९/८०० मध्ये सुधारण करणे २ कोटी ५० लाख, राज्य मार्ग ५० ते बोटा अकलापुर, पळशी, वनकुटे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २४ किमी ३१/०० ते ३६/०० सुधारणा करणे २ कोटी ४० लाख, राज्य मार्ग ५० ते बोटा अकलपुर, पळशी, वनकुटे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २४ किमी ३६/०० ते ४०/०० मध्ये सुधारणा करणे २ कोटी २५ लाख, राज्य मार्ग ६१ ते ढवळपुरी, ठाकरवाडी ते इतर जिल्हा मार्ग २६० रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग २०७ किमी ८/५०० ते ११/००, २३/९००ते २५/९०० सुधारणा करणे १ कोटी ३५ लाख, देवीभोयरे फाटा, सुपा, सारोळा रस्ता राज्य मार्ग ६९ किमी ०/५०० ते ०७/७०७, ३/५०० ते ४/५०० व ८/८०० ते १२ / ३०० मध्ये सुधारणा करणे ४ कोटी.

▪️या गावांमध्ये होणार रस्त्यांची कामे

पारनेर, जामगांव, भाळवणी ५ कोटी, नांदूरपठार ते कोरठण खंडोबा फाटा ४ कोटी ५० लाख, कारेगांव ते पिंपळगांव रोठा २ कोटी ४० लाख, पिंपळगांवतुर्क ते कान्हूरपठार २ कोटी १०लाख, निघोज कॅनॉल ते पिंपरीजलसेन २ कोटी ५० लाख, गारखिंडी ते कळस जिल्हा हद्द २ कोटी ५० लाख, खडकवाडी ते पळशी २ कोटी ४० लाख, पळशी ते वनकुटे २ कोटी २५ लाख, वनकुटे ते ठाकरवाडी १ कोटी ३५ लाख चिंचोली ते पुणेवाडी फाटा ४ कोटी.