राजुरी(गंगाराम औटी):डिसेंट फाउंडेशन जुन्नर व हिरकणी सेवा प्रतिष्ठान अंतर्गत एक साडी तिच्यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत गावातील व विविध नवरात्र उत्सव मंडळातील महिलांनी नव्या किंवा जुन्या वापरण्यायोग्य साड्या जमा करून या साड्या आदिवासी गोरगरीब ऊसतोड कामगार महिला,ठाकर महिला,कातकरी समाज या महिलांना दिवाळी भेटवस्तू स्वरूपात देण्यात येणार आहे.तसेच यासोबत दिवाळी फराळ वाटपही करण्यात येणार आहे हिरकणी सेवा प्रतिष्ठान अंतर्गत याही वर्षी राजुरी व सर्व नवरात्र मंडळ व गणेश मंडळ यांकडून जवळपास एक हजार पेक्षा जास्त साड्या जमा करण्यात आल्या.

राजुरी( ता. जुन्नर)येथील हिरकणी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जमा करण्यात आलेल्या 1000 साड्या सुपूर्त करताना
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवाई यांनी साड्या जमा करून सर्व मंडळांना एक साडी तिच्यासाठी चे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी डिसेंट फाउंडेशनचे सचिव आतार डॉ. जी. जी.शिंदे हिरकणी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष हेमलता शिंदे ,उपाध्यक्ष स्वाती बोरचटे, सचिव गुळणाज जमादार ,सदस्य मनीषा साळुंखे ,सारिका डहाळे, सुप्रिया औटी शितल हाडवळे जयश्री औटी आणि अनिता रायकर,प्रतिभा येवले,सुशीला हाडवळे या महिलांना कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.हिरकणी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.
या उपक्रमांचा फायदा सर्व सामान्य लोकांना होतो यामध्ये अनाथ अपंग निराधार अशा लोकांना मदत केली जाते.एक साडी तिच्यासाठी हा उपक्रम राबवल्यामुळे आम्हाला समाधान मिळते वसर्वसाधारण व्यक्तींना त्याचा फायदा होत असल्याचे मत हिरकणी सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हेमलता शिंदे यांनी सांगितले.