नृत्यमल्हार-२०२४’ या राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्यस्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी निमगावसावा पंडित नेहरू विद्यालयाचा प्रथम क्रमांक

सुरेश भुजबळ

पुणे:साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर,येरवडा,पुणे येथे पार पडलेल्या ‘नृत्यमल्हार-२०२४’ या राज्यस्तरीय आंतरशालेय नृत्य स्पर्धेत जुन्नर तालुक्यातील निमगावसावा येथील पंडित नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा लोकनृत्य या नृत्यप्रकारात प्रथम क्रमांक आला.

इयत्ता आठवी ते बारावी या गटात पंडित नेहरू विद्यालयाचा सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक आला असल्याची माहिती प्राचार्या श्रीमती चव्हाण यांनी दिली.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकनृत्य या नृत्यप्रकारा तील’लल्लाटी-भंडार’गीतावर नृत्य सादरीकरण केले होते.

विद्यालयाच्या या यशाबद्दल श्री रंगदास स्वामी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष श्रीप्रकाश बोरा,जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक भास्कर गाडगे,प्राचार्या चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.