बेल्हे जिल्हा परिषदेच्या शाळेत पालक मेळावा संपन्न

बेल्हे,दि.(प्रतिनिधी)बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचे मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी सांगितले.

बेल्हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.सुप्रिया बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पालक मेळाव्यात विद्यार्थांच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांची चर्चा करण्यात आली.नवीन शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिलीसाठी नवीन प्रवेशाची माहिती पालकांना संतोष डुकरे यांनी दिली.

विलास पिंगट यांनी शाळेत स्पोकन इंग्रजीचे क्लास सुरू करणेबाबत विषय घेतला,त्यास पालकांनी सहमती दर्शविली.वार्षिक स्नेहसंमेलन, मिशन बर्थडे उपक्रमांचा जमाखर्च पालकांसमोर मांडण्यात आला.

वार्षिक स्नेहसंमेलन,मिशन बर्थडे उपक्रम यशस्वीपणे राबवून शाळेचा भौतिकविकास करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दादाभाऊ मुलमुले,संतोष पाबळे,सोहेल बेपारी,प्रीतम मुंजाळ,सागर घोडे,शेखर पिंगट,वैशाली मटाले,मनीषा बांगर,शितल गुंजाळ यांनी अथक परिश्रम घेतले.पालक मेळाव्यात उपस्थित पालकांचे आभार उपशिक्षक हरिदास घोडे यांनी मानले.