आळेचा सरपंचपदी सविता भुजबळ विजयी

आळे(प्रतिनिधी)आळे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या झालेल्या अटीतटीच्या निवडणूकीत सविता चंद्रकांत भुजबळ या विजयी झाल्या.त्यांना सतरा पैकी अकरा सदस्यांनी मतदान केले.

आळे सरपंच प्रीतम काळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदाची निवडणूक गुरुवारी (दि.२७)घेण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांना बजावला होता.

आळे ग्रामपंचायत सभागृहात गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली.सतरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी प्रीतम काळे,दिगंबर घोडेकर,सविता भुजबळ, ज्योती शिंदे,मुकुंद भंडलकर यांनी अर्ज दाखल केले होते.

त्यात प्रीतम काळे,मुकुंद भंडलकर यांनी माघार घेतल्याने दिगंबर घोडेकर,सविता भुजबळ,सोनाली वाघोले यांच्यात सरपंच पदासाठी लढत झाली.सतरा सदस्यांपैकी सरपंच पदाच्या मतदान प्रक्रियेला मुकुंद भंडलकर गैरहजर राहिले उरलेल्या सोळा सदस्यांनी मतदान केले.त्यात सविता चंद्रकांत भुजबळ यांना अकरा,सोनाली वाघोले यांना तीन तर दिगंबर घोडेकर यांना दोन सदस्यांनी मतदान केले.

सरपंच पदी सविता चंद्रकांत भुजबळ या विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. पोटकुले यांनी घोषित केले.