आळेफाटा:-आळेफाटा येथील जैन श्रावक संघाच्या वतीने नवकार महामंत्र दिवस मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महावीर भाऊनाथ कार्यक्रमाला परिसरातील जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाची सुरुवात नवकार महामंत्राच्या जपाने व सामूहिक प्रार्थनेने झाली. वातावरण भक्तिमय झाले असून उपस्थितांनी शांतता, साधना आणि अध्यात्मिक एकात्मतेचा अनुभव घेतला.
या वेळी समाजातील ऐक्य, सद्भावना आणि अध्यात्मिक मूल्ये जपण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन श्रावक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यात अध्यक्ष संतोष कोठारी, समतीलाल गांधी, रवींद्र चंगेडिया, सुनील भंडारी, योगेश भंडारी, सुशील गुंदेचा, पंकज चंगेडिया आदींचा सक्रिय सहभाग लाभला.धार्मिक व सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम आळेफाटा परिसरात विशेष ठरला.