बेल्हे, दि.(प्रतिनिधी)बेल्हे-शिरूर महामार्गावरील बाह्यमार्ग पुलाचे अर्धवट असलेले काम तात्काळ पूर्ण करून रस्ता वाहतुकीला खुला करा,ग्रामस्थांच्या या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते कोणतीही दखल घेतली नाही.
गावच्या वाहतुकीची कोंडी सुटली पाहिजे, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे या मागणीसाठी बेल्हे विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक कैलास औटी या गावच्या ग्रामदैवत असलेल्या मंदिराच्या कळसावर चढून लक्षवेधी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.
बेल्हे गावची लोकसंख्या मोठी असून, गावचे बाह्यवळण महामार्गाचे काम दोन वर्षे रखडलेले आहे.गावात वाहतुकीची कोंडी होते.बेल्हे-शिरूर महामार्गावरील बेल्हे बाह्य वळण रस्त्याच्या कामास २०२० साली सुरवात झाली. गावात रस्त्याचे काम अर्धवट झाले रखडल्याने सदरचे काम अत्यंत निकृष्ट पध्दतीचे झाले आहे.हे काम २०२१ साली पूर्ण होणे अपेक्षित असताना रखडले.हे काम पूर्ण करून बाह्यवळण रस्ता तात्काळ वाहतुकीला खुला करा, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले.
बेल्हे ग्रामपंचायत पदाधिकारी सोबत मिटिंग लावून लवकरच काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.मात्र हे काम रखडले असल्यान हे दुर्दैव आहे.या सर्व प्रकाराने वैतागलेल्या बेल्हे विविध कार्यकारी सोसायटी चे संचालक कैलास औटी यांनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता बेल्हे गावचे ग्रामदैवत असलेल्या मुक्ताबाई देवीच्या मंदिराच्या कळसावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
आंदोलन सुरू करताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने बेल्हे बाह्यमार्ग वाहतुकीसाठी खुला केला.औटी यांच्याबरोबर बाळासाहेब गुंजाळ,देवराम पाबळे,सुरेश गुंजाळ,आनंदा मुलमुले,दादु गुंजाळ,राहुल बोरचटे,दादु खुटाळ हे ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.