राजुरी(गंगाराम औटी): राजुरी येथे आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सभापती दीपक औटी .उपसरपंच माऊली शेळके विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पप्पू शेठ हाडवळे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कारभारी औटी व्हा.चेअरमन अविनाश औटी वल्लभ शेळके माजी सरपंच एकनाथ शिंदे एम डी घंगाळे खरेदी विक्री संघाचे संचालक लक्ष्मण घंगाळे चंद्रकांत जाधव बाळासाहेब हाडवळे लक्ष्मण फावडे शाकीर चौगुले बाळाजी औटी रंगनाथ कणसे सचिव संतोष वायकर आदी उपस्थित होते.
यावेळी सरसमकर म्हणाले विविध कार्यकारी सहकारी सोसायटी राजुरी ही एक आदर्श संस्था असून शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 892 विविध कार्यकारी सोसायटी आहेत पण जुन्नर तालुक्यात पहिलंच केंद्र राजुरी येथे सुरु झाले.त्यामुळे डिजिटल युग असल्यामुळे ऑनलाइन सर्व योजनांचा फायदा शेतकऱ्यांना घेता आला पाहीजे त्यामधून शेतकऱ्यांचा फायदा होईल तर संस्थेलाही मोठा फायदा होईल. त्यामुळे आपल्या संस्थेचे नाव होईल प्रत्येकच सोसायटी नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत नाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून विविध उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे .
शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेकर्ज वाटप करणे व वसूल करणे व अनेक प्रकल्प हाती घेण्याची आवश्यकता आहे असे मत सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी व्यक्त केले