अहमदनगर – नगरमधील सबजेल चौकातील पलंगे कुटुंब मानकरी असलेल्या व सुमारे ८०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन नगर शहरात आगमन झाले असून पहिला मुक्काम भूतकरवाडीतील ताठे मळ्यात करण्यात आला दुसरा मुक्काम नालेगावातील नवग्रह मंदिरात करण्यात आला व आज शहरातील तोफखाना, चितळेरोड भागात फिरून तुळजाभवानी मंदिरात मुक्कामी राहिला विविध ठिकाणी पलंगाचे महिला भाविकांनी पूजन करून आरती केली
आज दिल्लीगेट येथे पलंगाचे आगमन झाल्यावर ब्युटी पार्लर असो अध्यक्षा अनुजा कांबळे यांनी पलंगाचे पूजन केले यावेळी अनंत पलंगे,गणेश पलंगे,उमेश पलंगे,विश्व् वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पाचारणे,शहर कार्याध्यक्ष महेश कांबळे,रिक्षा पंचायतचे उपाध्यक्ष दत्ता वामन,सबळ वादक भाऊसाहेब घावट,अमोल खडके,बळीराम वाडेकर, दिनेश फिरके सह भाविक मोठ्या संख्नेने उपस्थित होते तुळजापूरला पलंग घेऊन जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील खुंटेफळ, चिंचोडी पाटील, सय्यदपीर आणि कुंडी या चार गावचे लोक मानकरी म्हणून सोबत होते

तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे नगरमध्ये आगमन झाल्यावर विविध ठिकाणी पलंगाचे महिला भाविकांनी पूजन करून आरती केली
श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा प्रवास हा खूप थक्क करणारा आहे श्री.तुळजाभवानी मातेचा पलंग हा बनविण्याचा मान मूळचे घोडेगाव (भिमाशंकरजवळ) असणारे ठाकूर (कातारी) कुटुंबियांना आहे. पलंगाचे कातीव कामासाठी आंब्याचे आणि सागवान लाकुड, रंगकाम कामाकरिता लाखाचे रंग, लोखंडी साहीत्य खिळे पट्टी,सुती नवार पट्टी,दोरखंड,गादीसाठी कापुस,छताकरिता कापड तसेच इतर लागणारे सर्वे काही साहित्य ही जबाबदारीने अहमदनगर येथील पलंगे (तेली) घराण्याकडुन ठाकूर कुटुंबियांना पुरवले जातात.पलंग घोडेगाव मध्ये बनवून पूर्ण झाल्यावर त्याच्यावर दोरखंडाची बांधणी पलंगे कुटुंबियांकडून केली जाते आणि मग तो पलंग पुणे जिल्ह्यात फिरून नगर जिल्ह्यात आला चार दिवस नगर शहरात राहिल्यावर पुढे भिंगारला तिसऱ्या माळेला रात्री कलगीतुरा कार्यक्रम मध्ये पालखीची भेट घेऊन पुढे जाणार आहे