परदेशातील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व ध्येय निश्चिती असणे महत्त्वाचे – रचना गायकवाड

अहमदनगर,दि.(महेश कांबळे)-भारतातील विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठामधून उच्च शिक्षण घेण्यासाठी आत्मविश्वास व ध्येय निश्चिती असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन उच्च तंत्रज्ञान शिक्षित कु.रचना भास्कर गायकवाड हिने केले

पारनेर तालुक्यातील जय मल्हार विद्यालय पिंपळगावरोठा  या विद्यालयातील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना आज त्यांनी करिअर संबंधी मार्गदर्शन करताना केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुंबरे यु. जी ,शिक्षक उंडे बी. आर, जरांगे एन. बी,केदारी एन.बी.,गर्कळ बी.एस.सह विद्यार्थी  उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला रचना भास्कर गायकवाड हिने  इंग्रजी व मराठीतून उत्तरे दिली. कु.रचना भास्कर गायकवाड ही पिंपळगावरोठा येथील सौ.निर्मला व भास्कर विठ्ठल गायकवाड यांची कन्या असून तिने इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या शाखेत डिग्री शिक्षण घेतल्यानंतर पदव्युत्तर (Master’s In Information Systems) शिक्षण घेण्यासाठी ती यूनिवर्सिटी ऑफ डब्लिन (UCD)आयर्लंड – युरोप खंड या ठिकाणी गेली. तेथे मास्टर डिग्री घेतल्यानंतर तिथेच तिने वर्जिन मीडिया (Virgin मीडिया) मध्ये जॉब स्वीकारला.

भारतात आल्यानंतर गावी येऊन जय मल्हार विद्यालयातील विद्यार्थ्यांशी तिने संवाद साधला याप्रसंगी तिने विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी  आत्मविश्वास, सकारात्मकता त्याचबरोबर घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. जीवनात जर चांगले ध्येय गाठायचे असेल तर आपले स्रीत्व याचा अडसर येवू देवू नका असे मुलींना सांगितले. ग्रामीण भागातील मुली आणि मुले हे सुद्धा चांगलं यश संपादन करून उच्च पदावर जाऊ शकतात असा तिने विद्यार्थ्यांच्या मध्ये विश्वास निर्माण केला हे सांगताना माझ्या यशामागे सुद्धा माझ्या कुटुंबाचाच हातभार आहे 

            विद्यार्थ्यांमध्ये साहस करण्याची वृत्ती वाढावी म्हणून रचना हिने केलेल्या हेलिकॉप्टर मधून पॅराशुट च्या साह्याने केलेले आकाश भ्रमण आणि स्वखर्चाने युरोप खंडातील वेगवेगळ्या बारा देशांतील प्रमुख शहरांना केलेला प्रवास या गोष्टींना उजाळा दिला.आयर्लंड मधील लोकांचे अनुभव कथन करताना रचना म्हणते की, आयरिश लोकांमध्ये स्वावलंबन व वक्तशीरपणा या गोष्टीला अतिशय महत्त्व आहे. अत्यंत ओघवत्या भाषेत तिने इंग्रजी व मराठीचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयातर्फे रचना भास्कर गायकवाड हिचा सन्मान करण्यात आला.

       फोटो-  उच्च तंत्रज्ञान शिक्षित रचना  गायकवाड हिने  जय मल्हार विद्यालय  विद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन  केले यावेळी तिचा सत्कार करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुंबरे यु.जी  समवेत शिक्षक उंडे बी.आर, जरांगे एन.बी,केदारी एन.बी.  आणि गर्कळ बी.एस.सह विद्यार्थी