२०२३ला ‘गुडबाय’; नववर्षाला ‘वेलकम’जुन्नर तालुक्यात ‘थर्टीफस्ट’चा मोठा जल्लोष । मद्यपींनी लुटला मनमुराद आनंद

बेल्हे,दि.(सुरेशभुजबळ) सरत्या वर्षाला ‘गुडबाय’ आणि नववर्षाचे जल्लोषपुर्ण वातावरणात ‘वेलकम’ करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील अनेकांनी रंगीत-संगीत मैफिलीत ‘थर्टी फर्स्ट’चा मनमुराद आनंद लुटला.

बियरबार व हॉटेलमध्ये सरत्या वर्षाचा शेवट गोड करण्यासाठी सर्वत्र हॉटेल गर्दीने फुलून गेल्याचे चित्र दिसून आले. विविध गाण्यांच्या तालावर ठेका घरत आणि ‘पेगवर पेग’चा आनंद घेत नववर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी मद्यपींनी बियरबारमध्ये आनंद लुटण्यासाठी थर्टी फर्स्ट’ची बैठक हॉटेलात मांडून सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करत अनेक संकल्प रचत कोणी दारु न पिण्याचा निर्णय घेत मोठ्या धुमधडक्यात सरत्या वर्षाला निरोप देत ‘थर्टी फर्स्ट’साठी अनेक हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे बेत आखण्यात आले.

अनेक हॉटेलात गीतगायन, संगीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तर काही ठिकाणी विधायक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई मोठ्या जल्लोषात पुढे सरसावल्याचे दिसून आली.

काही हॉटेल व्यावसायिकांकडून हौशी खवय्यांसाठी विविध सुविधा देऊन ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनसाठी अनेक हॉटेलमध्ये भोजन तसेच गीतगायन व संगीत कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.

‘थर्टी फर्स्ट’ बहुतांशी लोकांनी हॉटेलात साजरा केल्यामुळे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत गाड्यांचा प्रचंड वेग वाढलेला दिसून आला. तर काही ठिकाणी अचानक ब्रेक लावल्यामुळे रस्त्यावर मोठ्या आवाजाची मालिकाच सुरु झाली होती. अनेकांना गाडीत बसलेला गृहस्थ सुखरुप घरी पोहोचेल की नाही? याची साशंकता निर्माण झाल्याचे दिसून आले.

अनेक रथी-महारथींनीही थर्टीफर्स्ट साजरा करत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तालुक्यापासून लांब अंतरावर जाऊन आपला आनंद व्दिगुणीत केला. सरत्या वर्षात झालेल्या चुका व आलेले संकट पुन्हा आपल्या नशिबी नको, म्हणून अनेकांनी काही चांगले नवे संकल्प करत आणाभाका घेत सरत्या वर्षाला अलविदा केला. नववर्षाचे उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले.