अहमदनगर दि.(महेश कांबळे)लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगांवरोठा तिर्थक्षेत्रावर यंदा पौष पौर्णिमा २५ ते २७ जानेवारी दरम्यान भरणाऱ्या वार्षिक यात्रोत्सवाला नियोजनाचा भाग म्हणुन यात्रेत शासकीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुर्ण वेळ कार्यरत ठेवणे आवश्यक आहे,अशी मागणी देवस्थानचे माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड,विश्वस्त धोंडीभाऊ जगताप यांनी केली आहे.
याबाबत लेखी निवेदन प्रांताधिकारी,तहसिलदार,पोलीस निरीक्षक पारनेर यांना दिले असून त्यात यात्रेचा मुख्य दिवस २७ जानेवारीला आहे. त्यादिवशी वाहने पार्कीगसाठी खंडोबा फाटा कमानीच्या बाहेर वाढीव वाहनतळ व्यवस्था ठेवणे जरुरी आहे.या दोन महत्वाच्या सुचना व इतर सुचना केल्या आहेत.
यात्रा आपत्ती व्यवस्थापन कक्षात आणि कक्षा बाहेर मुख्य ठिकाणी सर्व विभागांचे अधिकारी यांचे नांव हुद्दा मोबाईल नंबर बोर्डावर लावून यात्रेकरूंना संपर्क होऊन आपत्ती बाबत माहीती देता येईल.नायब तहसिलदार दर्जाचे अधिकारी यांचे देखरेखीखाली सर्व विभागांचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुर्णवेळ कार्यरत ठेवतील.२७ जानेवारीला गर्दीचा उच्चांक होईल म्हणुन वाहतुक नियंत्रण खंडोबा फाटा कमानीच्या बाहेर जागा उपलब्ध करुन वाढीव वाहनतळ व्यवस्था केल्यास मागील वर्षाप्रमाणे अनेक तास झालेली वाहनांची वाहतुक कोंडी होणार नाही.
यात्रेकरूंना माहितीसाठी सुचना,नियमावली याशिवाय फ्लेक्स बोर्ड,बॅनर जाहीराती यांना यात्रा व मंदिर परिसरात लावण्यास मनाई करावी.प्रशासनाच्या बैठकांची व त्यातील निर्णयांची,सुचनांची माहीती प्रशासन प्रमुखाकडुनच बातमीदारांना अधिकृत दिली जावी. कारण दि. २ जानेवारीला देवस्थानमध्ये झालेल्या प्रशासनाच्या बैठकीला हजर असलेले आणि तहसिलदारांच्या सुचनेनुसार यात्रा नियोजनाबाबत उपयुक्त सुचना बैठकीत मांडलेले माजी अध्यक्ष व विश्वस्त अॅड. पांडुरंग गायकवाड बैठकीत उपस्थित असलेले विश्वस्त धोंडीभाऊ जगताप यांची नांवे देवस्थान काही पदाधिकारी,काही विश्वस्त व काही बातमीदारांनी बातम्यांमधुन टाकली नाहीत.काही विश्वस्त बैठकीला हजर नव्हते आणि काही विश्वस्त बैठक संपल्यावर आले होते.तरी त्यांची नांवे बैठकीला उपस्थित म्हणुन बातीदारांनी बातम्यां मधुन छापली आहेत.हा पक्षपातीपणा देवस्थान पदाधिकारीचे नातेवाईक इसमाकडुन हेतुपुरस्सर होत आहे.त्यामुळे भाविक भक्त ग्रामस्थ यांच्यामध्ये नाराजी व असंतोष निर्माण होत आहे.
नियमानुसार देवस्थानचे पदाधिकारी यांनी विश्वस्त म्हणुन असलेले अधिकार व कर्तव्य स्वतःपार पाडायचे आहेत. विश्वस्त आपले अधिकार इतरांना बहाल करु शकत नाहीत.आणि इतर व्यक्तीही बेकायदेशिरपणे अध्यक्षांचे अधिकार वापरुन देवस्थान व प्रशासनाचे कामांत हस्तक्षेप करु शकत नाहीत,असे माजी अध्यक्ष अॅड. पांडुरंग गायकवाड,विश्वस्त धोंडीभाऊ जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.