बेल्हे,दि.(प्रतिनिधी)स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने कत्तलसाठी बेल्ह्यात चारा पाण्याची गैरसोय करून बांधून ठेवलेल्या 120 जनावरांची सुटका केली.या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात येवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाला गस्त घालत असताना बेल्हे गावात अवैद्यरित्या ११६ वासरू व ४ गायी अशी १२० जनावरे कत्तल करण्यासाठी त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने दोरखंडाने बांधून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आली.
या प्रकरणी अल्ताब हमीद व्यापारी वय वर्ष 48,हसिफ शरीफ व्यपारी वय 36,कल्पेश रौफ कुरेशी वय 19 सर्व राहणार पेठआळी,बेल्हे असे असून त्यांना ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत,सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे, तुषार पंधारे, पोलिस हवालदार दिपक साबळे, विक्रम तापकीर,जनार्धन शेळके,योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे पोलिस नाईक संदीप वारे,अक्षय नवले, दगडू वीरकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे,सहाय्यक पोलिस निरिक्षक महादेव शेलार यांनी केली.