बेल्हे ग्रामसभेत विकास विषयांवर चर्चा; विविध ठरावांना एकमताने मंजुरी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, विकासकामांच्या मागण्यांवर भर

बेल्हे:-बेल्हे येथील ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच मनीषा डावखर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.ग्रामसभेत विविध विकासकामे,शासकीय योजना,मनरेगा अंतर्गत आराखडे तसेच ग्रामविकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या ग्रामसभेला पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट, उपसरपंच नवनाथ शिरतर,ग्रामपंचायत सदस्या दिपाली मटाले,मंदाकिनी नायकोडी,कमल घोडे,ग्रामपंचायत सदस्य ताराचंद मुलमुले,नाजीम कुरेशी,नाजिम बेपारी,सामाजिक कार्यकर्ते कैलास औटी,जाणकू डावखर,महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष टीएल गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामविकास अधिकारी किशोर वाकडे यांनी मागील ग्रामसभेचा वृत्तांत वाचून दाखवत त्यास मान्यता घेण्यात आली.त्यानंतर मनरेगा अंतर्गत युक्त आराखडा तयार करणे,विविध शासकीय योजनांतील लाभार्थी निवड, GPDP आराखडा तयार करणे,वार्षिक ५%,१०% व १५% कृती आराखडे आणि विकास कामांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

ग्रामसभेदरम्यान ग्रामस्थांनी विविध प्रश्न मांडत गावातील मूलभूत सुविधा,रस्ते,पाणीपुरवठा,स्वच्छता तसेच विकासकामांबाबत सूचना मांडल्या. ग्रामस्थांच्या सूचनांची नोंद घेत अनेक विकासकामे प्रस्तावित करण्यात आली. सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

ही ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून ग्रामस्थांचा सहभाग आणि विकासकामांबाबतची जागरूकता विशेष लक्षवेधी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *