शिर्डी:-पारनेर तालुक्यातील बहुजन समाजाचे भूषण, “पिवळे वादळ” म्हणून परिचित असलेले तसेच जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस व अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. श्री. बाळासाहेब शिरतार यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या कार्याची दखल घेत शिर्डी येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात “समाजभूषण महाराष्ट्र राज्य साई गौरव जीवन पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
बाळासाहेब शिरतार हे लोककलावंत विचार मंच महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष तसेच पारनेर तालुका बलुतेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि जनसामान्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते.
या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे पारनेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, या सन्मानामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाळासाहेब शिरतार यांना “समाजभूषण महाराष्ट्र राज्य साई गौरव जीवन पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.