आळेफाटा:-रोटरी इंटरनॅशनलच्या रोटरी क्लब ऑफ आळेफाटा-मेन शाखेच्या सन २०२६-२७ वर्षासाठी अध्यक्षपदी रो.राजेंद्र जाधव,तर सचिवपदी रो. शुभम ढमाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विशेष म्हणजे, २ जून रोजी नवनियुक्त अध्यक्ष रो. राजेंद्र जाधव यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या निवडीबरोबरच वाढदिवसानिमित्तही रोटरी परिवारासह आळेफाटा परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
रोटरी इंटरनॅशनलच्या “Create Lasting Impact” या यंदाच्या संकल्पनेला अनुसरून आळेफाटा परिसरात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात शाश्वत व दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घडवून आणणारे सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नवीन कार्यकारिणीत रो. अमोल कापसे, डॉ. प्रदीप गुंजाळ, डॉ. महादेव वाणी, गणपत पाटील, ॲड. अमित कुटे, डॉ. अमोल डुंबरे, शिवाजी गोरे, जीवनभाऊ शिंदे, अक्षय मंडलिक, ऋषी पोळ, गौरव बनकर, हरिषचंद्र वाघुले, विकास मटाले, सचिन डुंबरे, रोशन घुले, मोहन जाधव, संपत राहणे, निलेश पाषाट, डॉ. शिवाजी सोनवणे, गणेश मेहेर, सुदाम ढमाले, श्रीकांत मदने, डॉ. सुयश गुंजाळ, गौरव कोकणे, विजय आवटे, राहुल शिंदे, प्रणव काळे, शंकर गडगे, शिवाजी कोते, उल्हास सहाणे, विलास देशमुख, शिवाजी चाळक, गणेश गुंजाळ, श्वेता वाळके आणि चंदा बांगर आदी सदस्यांचा समावेश आहे.
नवनियुक्त टीमच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ आळेफाटा-मेन सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवेल,असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला.