कोरठणला यात्रेनिमित्त आजपासून हरिनाम सप्ताह

अहमदनगर,दि.(महेश कांबळे)राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील कोरठण येथील खंडोबाच्या यात्रोत्सवास बुधवार दि १७ जानेवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहाने प्रारंभ होत असून असून १७ ते २४ जानेवारी दरम्यान विविध कीर्तनकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.मुख्य यात्रा दि २५ ते २७ जाणे संपन्न होणार आहे.

वैकुंठवासी तुकाराम महाराज शास्त्री यांच्या प्रेरणेने व डॉ. विकासानंद महाराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे नियोजन करण्यात  आल्याचे देवस्थानच्या अध्यक्षा सौ. शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे,विश्वस्त राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.

या सप्ताहामध्ये बुधवार दि.१७ जानेवारी रोजी बीड येथील संतोष महाराज वनव यांची कीर्तन सेवा पार पडणार आहे.दि.१८जानेवारी रोजी किल्ले धारूर येथील विकास महाराज देवडे, दि.१९ रोजी भिगवण येथील विकास महाराज देवडे,दि २०रोजी गेवराई येथील अक्रूर महाराज साखरे,दि.२१ रोजी आष्टी येथील सुनील महाराज झांबरे,दि.२२ रोजी पैठण येथील शिवानंद महाराज शास्त्री,दि.२३ रोजी हिंगोली येथील सोपान महाराज सानप तर दि.२४ जानेवारी रोजी सकाळी १० वा परभणी येथील बाळू महाराज गिरगांवकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.

या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत पहाटे ४ते६ काकडा भजन, सायंकाळी५ ते ६हरिपाठ,सायंकाळी ७ ते ९ हरिकिर्तन व त्यानंतर महाप्रसाद व जागर असे दैनंदिन कार्यक्रमांचे स्वरूप आहे.सप्ताहाचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे.

यापूर्वी वार्षिक यात्रोत्सवाच्या काळातच अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्याची परंपरा होती.मध्यंतरीच्या काळात चंपाषष्ठी उत्सवा दरम्यान सप्ताहाचे आयोजन करण्यात येत होते.

मात्र गावातील वारकरी सांप्रदायातीलनाथ भांबरे,चेअरमन पोपट सुपेकर,बबन भांबरे,महादू घुले,मार्तंड जगताप यांच्यासह वारकरी सांप्रदायाच्या मागणीनुसार यंदापासून पुन्हा यात्रोत्सवा बरोबच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आल्याचे माजी सरपंच अशोक घुले यांनी सांगितले.

या सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन पांडुरंग गायकवाड,सचिव जालिंदर खोसे, खजिनदार तुकाराम जगताप,चिटणीस कमलेश घुले,अशोक घुले,विश्वस्त राजेंद्र चौधरी,चंद्रभान ठुबे,सुवर्णा धाडगे,सुरेश फापाळे,रामदास मुळे,महादेव पुंडे,धौडीभाऊ जगताप,दिलीप घुले यांनी केले.