पारनेर(प्रतिनिधी):राज्य शासनाच्या नियोजन विभागातील रोजगार हमी योजना प्रभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघातील ३६ गावांमधील १०५ किलोमिटर अंतराच्या रस्त्यांसाठी २५ कोटी २० लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांना दिली.
विविध गावांमधील शेतकरी वर्गाकडून शिव पाणंद रस्त्यांची अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती.मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद योजनेअंतर्गत विविध गावांतील रस्त्यांसाठी नियोजन विभागाच्या रोजगार हमी योजना प्रभागाकडे पाठपुरावा करून जिल्हयात सर्वाधिक निधी मंजुर करण्यात यश आल्याचे आ.लंके यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघात रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली गावे व रस्त्यांची संख्या पुढीप्रमाणे:मुंगशी ४,निघोज २,पळशी ३, भाळवणी १,लोणीमावळा २,भोयरे गांगर्डा २,वडगांव सावताळ/ गाजदीपुर १०,म्हसोबा झाप ७, सावरगांव काळेवाडी ७,ढोकी २,तिखोल १,ढवळपुरी ७,सांगवी सुर्या १,कळस ५,टाकळीढोकेश्वर ३,रांधे १,वाडेगव्हाण ४,करंदी २,हत्तलखिंडी २ बाबुर्डी ६,काताळवेढे २,कान्हूरपठार ३,वाळवणे २,हंगा ३,हिवरे झरे २,वाकोडी ३,खडकी १,पिंपळगांव कौडा १, भोयरे पठार १,निमगांव वाघा २,चास भोरवाडी १,भोरवाडी १,शिंगवे नाईक १४.
◼️जिल्हयात सर्वाधिक निधी
नगर जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी एकूण ३१६ किलोमिटर रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजुर झाला असून त्यापैकी सर्वाधिक १०५ किलोमिटरसाठी निधी पारनेर-नगर मतदारसंघासाठी खेचून आणण्यात आ.नीलेश लंके यांना यश आले आहे.