पुणे(प्रतिनिधी):-भोसरी येथील नक्षत्राचं देणं कायमंच, मुख्यालयाच्यावतीने राज्यस्तरीय प्रेम काव्य मैफलल व फुलोरा प्रेमाचा या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.त्याचवेळी कवी वादळकार यांच्या प्रेम क्लिनिक या थिएटर शोच्या कवितांचा कार्यक्रमही झाला.
ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार प्रा.तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाज सेवक सुभाष चव्हाण,बोल्ड कवी म.भा.चव्हाण,सुप्रसिद्ध चित्रकार सुहास जगताप,सौ.जया बोरकर,सिराजमुल्लानी, सुनिल जाधव,भाऊसाहेब आढाव,यशवंत घोडे उपस्थित होते.
वृक्षाला पाणी घालून पर्यावरण संदेश देत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.तुकाराम पाटील यांनी नक्षञाचं देणं काव्यमंच एकमेव संस्था आहे की,जी कवींच्या हक्का च्या आणि सन्मानासाठी गेले २४ वर्ष सातत्यपूर्ण काम करत आहे.याचा मी एक साक्षीदार असल्याचे सांगितले.
जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून जगणे स्वीकारले पाहिजे.बंधने झुगारून माणसाने प्रेमाने माणुसकी जपली पाहिजे,अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटक समाजसेवका सुभाष वाल्हेकर याप्रसंगी म्हणाले की ‘”कवीच्या कविता या पुस्तकात न राहता. थत्या वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे .यासाठी संस्थेने काव्यसंग्रह प्रकाशन आणि एक तास कवितेचा हा जो उपक्रम राबवला आहे .यातून नक्कीच कवींची प्रतिभा फुलत राहणार आहे. काव्य कार्यक्षमता वाढत राहणार आहे. भविष्यामध्ये नामवंत कवी या व्यासपीठाने व्यासपीठावर घडतील अशी मला अपेक्षा आहे.”
प्रेम काव्य मैफलीमध्ये पद्याकर वाघरुळकर,अशोक वाघमारे,सौ.अनुराधा इंगवले,नितीन भोसले,विलास कुंभार ,शांताराम सोनार,सरदार मनोज,बबन चव्हाण,दत्ताञय भोसले,सौ.कमल आठवले,प्रशांत निकम,आनंद गायक वाड,संभाजी रणसिंग,बशीर मुलाणी,भरत जोशी,अशोक सोनवणे,प्रतिभा किर्तीकर्वे या कवींनी कवितांचे सादरीकरण करुन मैफलची रंगत वाढविली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केले तर आभार कवी यशवंत घोडे यांनी मानले.