पांगरे | येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरु कृषी महाविद्यालय मिरजगाव येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पांगरे ता. करमाळा जि.सोलापूर येथे कृषीदूतांनी शेतकऱ्यांना गांडूळ खताचे प्रात्यक्षिक करून त्याचे फायदे सांगितले. गांडूळ खत तयार करण्यासाठी Eisenia foitida ही गांडूळाची जात वापरली. त्याप्रसंगी पांगरे गावचे सरपंच प्रा. विजया सोनवणे, अॅड. दत्तात्रय सोनवणे, उपसरपंच मनिषा गायकवाड, धनंजय गायकवाड, ग्रामसेवक समाधान कांबळे, शाळा व्यवस्तापन अध्यक्ष महेश शेळके, ग्रा.स.सचिन पिसाळ महेश टेकाळे, जल सुरक्षक गोपाल कोळी तसेच गावचे प्रतीष्टित ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक शंकर नेवसे, अध्यक्षा कल्याणीताई नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के बिटे, कार्यक्रम अधिकारी प्रा. यादव एस. व्ही, प्रा. काळे ऋषीकेश आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.