अहमदनगर(महेश कांबळे): नगर-बन्सी महाराज मिठाईवालेचे धीरज जोशी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्याना त्वरित अटक करावी यासाठी आज सकल ब्राह्मण समाज महासंघ नगर जिल्हा व बन्सीमहाराज परिवाराच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला याना निवेदन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष राजाभाऊ पोतदार,विजय देशपांडे,राजेश भालेराव,नंदकुमार पोळ, प्रभाताई भोंग,श्रुती मनवेलीकर आदींसह जोशी परिवारातील अशोक, राजकुमार,संजय,गोविंद,अनिल सह महिला व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
निवेदनात म्हटले आहे कि १० फेबु रोजी सायंकाळी अहमदनगर शहरातील सुप्रसिध्द मिठाईवाले धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.ते आपले दैनिक कामकाज करुन घराकडे जात असतांना त्यांच्यावर बंदूकीचा धाक दाखवून तलवारीने मारहाण करण्यात आली.सकल ब्राह्मण समाज महासंघ या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो व आरोपींना अटक व कठोर शासन न झाल्यास मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करु.नगर शहरात वारंवार घडणाऱ्या व्यापारी व सर्व सामान्यांवर होणाऱ्या हल्याचा पोलीस प्रशासनाने गांर्भियाने विचार करावा व दोषींवर कायद्याने कडक कार्यवाही करावी ही विनंती
प्रथम समाजाचे शेकडो पदाधिकारी हॉस्पिटल जवळ जमले तेथून ते पायी एस पी ऑफिस ला गेले तिथे निवदेन दिले व चर्चा केली यावेळी बोलताना समाज बांधव म्हणाले धीरज यांचा कोणाशी वाद नाही भांडण नाही तरी का हल्ला झाला,पहिले पिस्तूल म्हटले व आता ते लायटर होते अशी बातमी आली नक्की काय होते . यावर बोलताना ओला म्हणाले एकूण ४ टीम तपास करत आहे विविध ठिकाणचे फुटेज तपासले जात आहे लवकरच आरोपी निष्पन्न होईल जेथे हल्ला झाला तिथे फुटेज तपासले आहे व तपास चालू आहे यावेळी महिलांनी आम्हाला येथे राहण्यास भीती वाटते असे सांगितले तेव्हा ओला म्हणाले आरोपी पकडे पर्यंत पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल मुलीच्या १२ विच्या परीक्षेला सोबत लेडीस पोलीस दिली जाईल व काही वाटले तर मला कॉल करा असेही ते म्हणाले