विकास कामात राजकारण केल्याने गावचा विकास खुंटतो-आमदार निलेश लंके

पारनेर(प्रतिनिधी):-पारनेर तालुक्यातील वासुंदे गावाचे व माझे वेगळे नाते असून वासुंदे गावासाठी अद्याप पर्यंत वेगवेगळ्या निधीतून जवळपास १२ ते १३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.परंतु विकास कामे व राजकारण या दोन भिन्न गोष्टी असून विकास कामात राजकारण आणता कामा नये. विकास कामात राजकारण आल्यास गावचा विकास खुंटतो अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे.वासुंदे  गावातील पाटील मळा येथील गांगड वस्ती ते ठाकर वस्ती या २० लक्ष रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन समारंभ शुक्रवारी आमदार निलेश लंके यांच्यासह भागुजी दादा झावरे व पोपटराव साळुंके यांच्या शुभहस्ते पार पडला.

  यावेळी भागुजी दादा झावरे पोपटराव साळुंके गुरुजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी सरपंच प्रकाश राठोड सरपंच संजय रोकडे उपसरपंच रामभाऊ तराळ  दत्तात्रय निवडुंगे रविंद्र झावरे डॉ उदय बर्वे रावसाहेब बर्वे सुदाम शिर्के बबनराव गांगड पंढरीनाथ गांगड संजय खिलारी मेजर अमोल आल्हाट गंगाधर गांगड, किसन गांगड, परशुराम गांगड, त्रिंबक शिंदे, गुलाब गांगड रामचंद्र गांगड श्रीमंत हिंगडे,सूर्यभान शिंदे, दत्ता वाळुंज, रामदास झावरे, घनश्याम झावरे, संपत झावरे सर, जयेश झावरे, विजय झावरे, रावसाहेब ठुबे, पोपट झावरे, बाळासाहेब झावरे, तानाजी शिर्के, रोहिदास शिर्के, भाऊसाहेब शिंदे,युवराज मदने, मारुती ठुबे, संतोष भालेकर, टी लु टोपले, रावसाहेब हिंगडे, तबाजी टोपले, शिवाजी झावरे डॉ बाबासाहेब गांगड, अर्जुन गांगड, प्रवीण गांगड, अनिल गांगड, किशोर गांगड, विठ्ठल गांगड  विट्ठल हिंगडे, किरण वाळुंज, ठकाजी चिकने, नवनाथ केदार, बाळू चिकने, व गांगड मळ्यातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  यावेळी आमदार लंके म्हणाले की ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी बराच वेळा ग्रामपंचायत ठरावाची गरज असते. परंतु स्थानिक पातळीवर राजकीय सडातून हे ग्रामपंचायत ठराव देत नाही त्यामुळे विकास कामाला खीळ बसते परंतु राजकारण राजकारणाच्या ठिकाणी तर विकास कामे विकास कामांच्या ठिकाणी असली पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा आमदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

बाळुमामा मंदिर जिर्णोद्धारासाठी १५ लाख रुपयांचा निधी..

वासुंदी गावातील पाटील मळा येथील बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी गेले असता लोकसभागातून या मंदिराचा जिर्णोद्धार करावा अशी सूचना आमदार निलेश लंके यांनी केली. या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी माझ्याकडून १५ लाख रुपयांचा आमदार निधी त्यांनी यावेळी जाहीर केला. एक आदर्श देखणे मंदिर लोकसहभागातून उभे करावे असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले.

आदिवासी ठाकर समाजाची थेट निलेश लंकेंकडे तक्रार..

वासुंदे येथील ठाकर वस्तीवरील आदिवासी ठाकर समाजातील लोकांनी घरकुले व इतर योजनांचा लाभ मिळत नसण्याची तक्रार आमदार निलेश लंके यांच्याकडे केली. ग्रामसेवक भास्कर लोंढे यांच्याशी संपर्क करत आमदार निलेश लंके यांनी तातडीने या आदिवासी समाजाची वैयक्तिक लाभासह इतर प्रकरणे सादर करण्याचे आदेश दिले. तसेच विकास कामत राजकारण न करण्याचा सल्ला सुद्धा ग्रामसेवक लोंढे यांना दिला आहे.