आळेफाटा(सुरेशभुजबळ)पुणे-नाशिक महामार्गलगत आळेफाटा परिसरात असलेल्या भंगार दुकानांमध्ये भंगार विक्रीच्या नावाखाली अनेक चोरीच्या दुचाकी, चारचाकी वाहने नष्ट केली जात आहे.
परप्रांतीय नागरिकांनी बाहेरून येऊन भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी पुणे-मुंबई येथील जुनी वाहने आणून परिवहन खात्याची परवानगी न घेता नष्ट केली जात आहे.
महागड्या जागा खरेदी करून दुकानासाठी मोठी शेड उभारून मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. या दुकानांमध्ये अत्याधुनिक पद्धतीच्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मोठ्या वाहनांना नष्ट करून हे भंगार अत्यंत महागड्या दरामध्ये विकले जात आहे.
या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. जुनी असणारी वाहने नष्ट करून त्याचे भंगार करून विकले जावे, अशी अपेक्षा असताना मात्र काही दुकानात तर चक्क चोरीच्या वाहनांचा वापरही मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे.
भंगारात आलेली वाहन नष्ट करण्या अगोदर परिवहन खात्याच्या अधिकार्यांची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे.मात्र अशा प्रकारची परिवहन विभागाची कुठलीही परवानगी न घेता आळेफाटा परिसरातील दुकानांमधून वाहन नष्ट केले जात आहे. आळेफाटा चौकातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर दहा ते पंधरा मोठी दुकाने नियम धाब्यावर बसवून परिवहन विभागाच्या नाकावरती टिचू भांगर दुकांचालक खुलेआम हाव्यवसाय करत आहे.
पोलिसांना आळेफाटा परिसरात सुरू असलेल्या भंगार व्यवसायाबाबत कल्पना असतानाही ते या व्यावसायिकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाहीत.वरिष्ठ अधिकार्यांनी यात लक्ष घालून या भंगाराचा बेकायदेशीर व्यवसाय करणार्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.