बेल्ह्यात तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

बेल्हे(प्रतिनिधी)चिठ्ठीत चार जणांची नावे लिहून बेल्ह्यातील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.आळेफाटा पोलिस ठाण्यात त्या जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेष लक्ष्मण गुंजाळ या बत्तीस वर्षीय तरुणाने घरातील छताच्या पंख्याला ओढणी बांधुन गळफास घेत आत्महत्या केली.त्याच्या खिशात निघालेल्या चिठ्ठीत बेल्ह्यातील चार प्रतिष्ठित व्यक्तींनी आर्थिक व्यवहारासाठी त्याचा मानसिक छळ केल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटले.मयत तरुणाचे वडील लक्ष्मण भास्कर गुंजाळ यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बेल्ह्यातील चार जणांविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर करीत आहेत.