पाणी वापर संस्थाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक खेळीमेळीत

पारगाव(प्रतिनिधी)पारगाव तर्फे आळे येथे,ग्रामसंसद सभागृहात मीना शाखा कालव्यावरील २८ पाणी वापर संस्थाच्या पदाधिकाऱ्याची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

मीना शाखा कालव्याचे अध्यक्ष तथा घोड व कुकडी कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मीना शाखा कालव्यावर वितरिका स्थरिय पाणी वापर संस्था तातडीने सुरू होत असल्याने,त्यासाठी आवश्यक त्या बाबीची पुर्तता करण्याची माहिती सुभाष झिंजाड यांनी दिली.येत्या ८ दिवसात वितरिका स्थरिय पाणी वापर संस्था संचालक मंडळाची परिपुर्ण यादी कार्यकारी अभियंता यांना देण्याचे सर्वानुमते ठरले.

या बैठकीला टाकळी हाजी,जांबुत,शिरोली गावचे पाणी वापर संस्थाचे चेअरमन,संचालक,सभासद,शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या चर्चेत धोंडीभाऊ भोर,ज्ञानेश्वर उंडे,रखमा निचित, संपतराव पानमंद, संदिप आदक,रोहीदास मुसळे,कैलास पवार यांनी सहभाग घेतला.संस्थेचे सचिव पाडुरंग डुकरे यांनी आभार मानले.