बेल्हे । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं- शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सरपंच मनिषताई डावखर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक विलास पिंगट यांनी केले.विजुकाका घोडके यांच्या शुभहस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन झाले. मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जानकू डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, मा.उपरपंच निलेश कणसे,प्रदीप पिंगट,अनघाताई घोडके,सावकार पिंगट,सुमित बोरचटे इ.मान्यवरांनी बालचमुंना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महिला पालकांसाठी खेळ पैठणीचा,प्रेक्षकांसाठी भव्य लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य समीर गायकवाड,मंदाकिनी नाईकवाडी, नाजिम बेपारी,अप्पा मूलमुले,समाजिक कार्यकर्ते अशोक घोडके,सीमाताई बोरचटे पत्रकार अण्णा भुजबळ,अर्जुन शिंदे,विजय देशपांडे इ मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील सर्व विद्यार्थांनी यामध्ये सहभाग घेत विविध कलागुणांचा अविष्कार सादर केला. गणेशवंदना,बालगीते,लाणी ,गोंधळ , हिंदी गीत ,राजस्थानी गीत,कोळीगीत,महाकाली,मराठी आणि हिंदी फ्युजन अशा अनेक गीतांचे सादरीकरण यावेळी कऱण्यात आले.प्रेक्षकांनी संपूर्ण कार्यक्रमांचा आनंद घेत भरघोस बक्षिसे देत मुलांचे कौतुक केले.
शाळेतलील सर्व मुलांना कार्यक्रमात सहभाग घेता यावा म्हणून कोरिओग्राफर व ड्रेपरी खर्चासाठी सहप्रायोजक म्हणून अनेक दानशूर देणगी दारांनी यासाठी सहकार्य केले.कार्यक्रमांनातर अन्नदानासाठी अनेक सन्माननीय देणगीदारांनी मदत केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा शिक्षक नेते खंडेराव ढोबळे,शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे,सभापती अनिल कुटे, संचालक ,रवींद्र वाजगे,अशोक बांगर ,बेल्हे केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी उपस्थीत राहून विद्यार्थांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेतील उपशिक्षक सुवर्णा गाढवे,कविता सहाणे,योगिता जाधव,प्रविणा नाईकवाडी, सुषमा गाडेकर,अंजना चौरे सर्व शिक्षकांनी केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी भरघोस अशी देणगी दिल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापिका सौ.मीरा बेलकर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले ,उपाध्यक्ष सोहेल बेपारी,सदस्य प्रितम मुंजाळ,संतोष पाबळे,शेखर पिंगट,संदीप खोमणे, वैशाली मटाले,मनीषा बांगर ,पायल सोनवणे,राणी पारवे, शितल गुंजाळ , इ.सदस्यांनी ग्रामस्थ व पालक यांनी शाळेला 1 लाख 75 हजार रुपयांचे सहकार्य केलेबद्दल सर्व देणगी दारांचे आभार मानत देणगीदारांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.संतोष डुकरे व आभार श्री हरिदास घोडे यांनी मानले.