प्रगती पतसंस्थेत अपहार करणाऱ्या बारा संचालकासह दोन व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

बोरी बुद्रुक:प्रतिनिधी:-बोरी बुद्रुक(ता.जुन्नर)येथील प्रगती ग्रामीण पतसंस्थेच्या संचालक मंडळाने व्यवस्थापकाच्या संगमताने दोन कोटी ८५ लाख ४६ हजार ८९६ रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळेफाटा पोलिस ठाण्यात लेखा परीक्षक संतोष दशरथ बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदिप किसन कोरडे, रमेश हनुमंत जाधव,कै.राजेंद्र नारायण घोलप(मयत), चंद्रकांत देवराम जाधव,राम वसंत बढे,बन्सी नाथा कोरडे, खंडेराव जानकु कोरडे,संजय दषरथ जाधव,अविनाष मनोहर गुंजाळ,संजय पांडुरंग हलकरे,सौ.सुषिला भिकाजी जाधव,सौ.अरुणा सुरेष जाधव(हे सर्व रा.बोरी बुद्रुक,ता. जुन्नर),संतोश ज्ञानदेव साबळे(व्यवस्थापक),रितेष सोपान पानसरे(हे दोघे व्यवस्थापक,रा.साकोरी,ता.जुन्नर,जि.पुणे) यांच्यावर भा.दं.सं.कलम १८६०चे कलम ४०६,४०८,४०९, ४२०,४६३,४६४,४६५,४६७,४६८,४७१,४७०,१२०-८,४७७-अ,३४,महा ठेवीदाराच्या(वित्तीय संस्थामधील वितसंबंधांचे संरक्षण)अधि१९९९चे कलम ३,४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरी बुद्रुक(ता.जुन्नर)येथील प्रगती ग्रामीण पतसंस्थेत १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान कालावधीत वरील संचालक मंडळ व व्यवस्थापकानीं संगनमताने ठेवीदारांच्या खात्यामध्ये चुकीच्या नोंदी व रोजकिर्दला चुकीचा जमा खर्च करून गैरव्यवहार व अपहार केलेला आहे.सहकार कायदा, कानून व पोट नियमांचे उल्लंघन केले असून संस्थेची चुकीची आर्थिक पत्रके तयार करून संस्थेची खरी आर्थिक परिस्थिती दडवून, चुकीचे वार्षिक अहवाल तयार केला.नियमबाहय बोगस कर्ज वितरण करणे,बँकेच्या ठेवी परस्पर काढून त्याची विल्हेवाट लावणे,वार्षिक सभा व मासिक सभा इतिवृत्तांत नोंद वहह्या ठेव खतावणी, कर्ज खतावणी, सभासद कर्ज अर्ज, सभासद कर्ज प्रकरणे तपासणीसाठी लेखापरिक्षणास सादर न करणे, पदाचा गैरवापर करणे,संस्थेच्या सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वासघात करून दोन कोटी पंच्याऐंशी लाख शेहचाळीस हजार आठशे श्याहनव्व रुपयांचा गैरव्यवहार करून अफरातफर व फसवणुक केल्याचे आढळून आल्याने प्रमाणित लेखापरिक्षक यांनी त्यांचा वैधानिक लेखापरिक्षण अहवाल व विशेष लेखापरिक्षण अहवालानुसार संतोष दशरथ बांगर यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.या फिर्यादी वरून बोरी बुद्रुक व साकोरी येथील वरील व्यक्ती विरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहे.