सचिन कांकरिया सचिव; सुरेश भुजबळ जिल्हा निमंत्रकपदी बिनविरोध निवड
नारायणगाव : मराठी पत्रकार परिषद, मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाची सन २०२६ साठी नूतन कार्यकारिणी नारायणगाव येथे झालेल्या वार्षिक सभेत सर्वानुमते बिनविरोध निवडण्यात आली.
पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष मीनानाथ पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दै.सकाळचे अशोक खरात यांची अध्यक्षपदी, दै.लोकमतचे सचिन कांकरिया यांची सचिवपदी,तर दै.दिव्य मराठीचे सुरेश भुजबळ यांची जिल्हा निमंत्रकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत प्रवीण फल्ले व दिनकर आहेर (उपाध्यक्ष),धर्मेंद्र कोरे (कार्याध्यक्ष),अर्जुन शिंदे (सहसचिव), विजय लोखंडे (खजिनदार),महेश घोलप (सहखजिनदार) यांचा समावेश आहे.
तसेच दादा रोकडे (तक्रार निवारण समिती अध्यक्ष), मीनानाथ पानसरे (जुन्नर विभाग प्रमुख), अमर भागवत (नारायणगाव विभाग प्रमुख), विजय देशपांडे (आळेफाटा विभाग प्रमुख) व ॲड. संजय शेटे (ओतूर विभाग प्रमुख) यांची नियुक्ती करण्यात आली.
संघाच्या सदस्यपदी राजेश कणसे, गोकुळ कुरकुटे, अशोक डेरे, विजय चाळक, अतुल कांकरिया, मंगेश पाटे, रवींद्र कोल्हे, हितेंद्र गांधी, अमोल गायकवाड, प्रवीण ताजने, दुष्यंत बनकर, वसंत शिंदे,अभिषेक भुजबळ, अण्णा लोणकर यांचा समावेश आहे.
संघाचे सल्लागार म्हणून रवींद्र पाटे, नितीन गाजरे, नितीन ससाणे, आनंद कांबळे, लक्ष्मण शेरकर, ज्ञानेश्वर भागवत यांची नियुक्ती करण्यात आली असून, कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. यू. सी. तांबे, ॲड. रवींद्र देवकर, ॲड. भूषण शेटे, ॲड.अनिकेत भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक खरात यांनी बोलताना, “२०२६ च्या कार्यकाळात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक व कल्याणकारी उपक्रम राबविण्याचा मानस आहे,” असे सांगितले.