सावरगावात लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम


सावरगाव:- जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या १७ जुलै रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त सावरगाव येथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून समाजसेवेचा संदेश देत नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि कलावंतांना मदतीचा हात देण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा. बाळासाहेब भाऊ शिरतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमात मातोश्री हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत औषध व गोळ्यांचे वाटप, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेसाठी KYC नोंदणी शिबिर, जिल्हा परिषद शाळा सावरगाव व हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, तसेच संघटनेच्या वतीने १०० कलावंतांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १५ मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि कलावंतांची उपस्थिती लाभली. यामध्ये पुणे जिल्हा परिषद सदस्य अमोल शेठ उगले, युवा उद्योजक रामू दादा थोरात, रामदास साळवे, मंगेश शिंदे, गणेश जेजुरकर, अश्विनी बोरुडे, राहुल शिरतार, उत्तम वायदंडे, रवींद्र साळवे, दिगंबर भारती गुरुजी, युवराज जगताप मोरे, पत्रकार सुरेश आण्णा भुजबळ, उदोजक वैभव शेठ काळे, बाळासाहेब चिकणे, उपसरपंच सुनील ताबुळी, प्रथमेश साळवे, सचिन भोजने आणि अलका ताई झरेकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार संजय मोरे यांनी केले. यावेळी शाहीर जयसिंग माळवदकर, स्वप्नवेद अनाथालयाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोजने पाटील, उद्योजक वैभव काळे तसेच कलावंतांच्या वतीने गायकांनी मनोगत व्यक्त करत समाजसेवा, शिक्षण, कला संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
संपूर्ण कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाढदिवस केवळ उत्सव म्हणून न साजरा करता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा आदर्श जय मल्हार क्रांती संघटनेने घालून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.