आळेफाटा : जीवनात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी स्पष्ट उद्दिष्टासोबतच जिद्द,चिकाटी,सातत्य आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते.अडचणींना घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचा सामना करून ध्येयाच्या दिशेने सातत्याने वाटचाल केली, तर यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन डॉ. विजय जानराव काकडे यांनी केले.
बाळासाहेब जाधव कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्याल, आळे येथे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेअंतर्गत ‘अनंत आमची ध्येयशक्ती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बाहिःशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. १३) रोजी हा कार्यक्रम झाला.
विद्यार्थ्यांनी जीवनात निश्चित ध्येय ठेवून त्यासाठी प्रामाणिकपणे आणि सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी अंगीकारावी, असे मार्गदर्शन डॉ.काकडे यांनी केले.त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना ध्येयनिश्चिती, व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी याबाबत प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी केले.त्यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. प्रा. नितीन मोरे यांनी प्रमुख वक्ते डॉ. विजय जानराव काकडे यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी डॉ. अरुणा वाघोले यांनी सांभाळली. मेजर डॉ. सुषमा कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी डॉ.सविता रहांगडाले, डॉ.अनिल उगले, डॉ.मनीषा गिरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अजयनाना कुऱ्हाडे,बाळासाहेब जाधव,उपाध्यक्ष सौरभ डोके,मानद सचिव डॉ.अर्जुन पाडेकर,खजिनदार अरुण हुलवळे तसेच संचालक मंडळातील किशोर कुऱ्हाडे, भाऊ कुऱ्हाडे,बबन सहाणे,उल्हास सहाणे,बाबु कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ,जीवन शिंदे,दिनेश सहाणे,कैलासशेठ शेळके महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर,सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे,शांताराम कुऱ्हाडे तसेच सर्व संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.