बेल्हे:-बेल्हे येथे आर. के. बाजारचा भव्य शुभारंभ रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी उद्घाटन समारंभाने होणार आहे. उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विशेष आकर्षक योजना जाहीर करण्यात आली असून, ५०० रुपयांची खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला लकी ड्रॉचे कूपन देण्यात येणार आहे.
या लकी ड्रॉ चा निकाल 30 नोव्हेंबर ला होणार आहे,महिलांसाठी एक आणि पुरुषांसाठी एक अशा दोन स्कुटी बक्षिसांमध्ये देण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्घाटनाच्या दिवशी आर. के. बाझारमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
याबाबत आर. के. बाझारचे मुख्य संचालक मनोज डुंबरे पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, ग्राहकांना दर्जेदार वस्तू, वाजवी दर आणि विनम्र सेवा देण्यावर आर. के. बाजारचा भर राहणार आहे.
आर. के. बाजारच्या ठाणे जिल्ह्यात २५ शाखा, तर पुणे जिल्ह्यात ३ शाखा कार्यरत आहेत. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देतानाच ग्राहकांना ‘एकावर एक मोफत’ अशा विविध आकर्षक ऑफर्स आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बेल्हा येथे तब्बल एक एकर जागेवर आर. के. बाजारची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली असून, ग्राहकांना विविध वस्तूंची मोठी चॉईस मिळणार आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्किंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्राहकांना खरेदीचा उत्तम अनुभव मिळावा, यासाठी बाजारपेठेतील विविध वस्तू, वाजवी दर, आकर्षक ऑफर्स आणि ग्राहकाभिमुख सेवा यांचा समन्वय साधण्यात आला आहे.
दरम्यान, उद्घाटनाच्या दिवशी ५०० रुपयांच्या खरेदीवर लकी ड्रॉचे कूपन मिळणार असल्याने ‘महिला आणि पुरुषांपैकी स्कुटीचे भाग्यवान विजेते कोण ठरणार?’ याकडे आता बेल्ह्यासह परिसरातील ग्राहकांचे लक्ष लागले आहे.