जुन्नर(प्रतिनिधी): अवकाळी पावसामुळं उन्हाळ्यात टोमॅटो उत्पादकांना मोठं नुकसान सोसावे लागले होतं.मात्र आता या दरवाढीमुळं महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. जुन्नर तालुक्यातील ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर या शेतकरी दाम्पत्यानं सव्वा कोटी रुपयांची कमाई केली आहे. जुन्नर तालुक्यातील पाचघर गावातील गायकर दाम्पत्यानं १२ एकरातील टोमॅटो पिकाच्या जोरावर सव्वा कोटी रुपयांची कमाई केली. गायकर दाम्पत्य गेल्या सात वर्षांपासून टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत.यावेळी त्यांच्यासह इतर शेतकरी देखील लखपती झाले आहेत.
गेली दोन वर्ष टोमॅटो या पिकाला बाजारभाव नसल्याने अनेक टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र यावर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे सर्व टोमॅटो मार्केट फुल्ल असल्याचे पहायला मिळत आहे. टोमॅॅटो मुळे जुन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याचे नशीबच पालटले आहे. टोमॅटोमधून त्याला जणू काही लॉटरीच लागली आहे. जुन्नर तालुक्यातील एका शेतकरी दाम्पत्याचं या टोमॅटोने कोट्याधीश बनवले आहे. ईश्वर गायकर आणि सोनाली गायकर असं या शेतकरी दाम्पत्याचं नाव आहे.
जुन्नर तालुक्यातील पाचघर हे गाव आहे.पाणी असल्याने या गावाचा कायापालट झाला आहे. या गावातील तुकाराम भागोजी गायकर हे शेतकरी याच गावात राहणारे. त्यांची परंपरागत शेती आहे. या भागात जवळपास १८ एकर क्षेत्र बागायती आहे. त्यापैकी बारा एकर क्षेत्रावर गायकर यांचा मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली गायकर शेती बघतात. ते दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करतात. मात्र यंदाच्या वर्षी लावलेल्या टोमॅटोने त्यांना करोडपती बनवले आहे.
गायकर यांना टोमॅटो विक्रीसाठी नारायणगाव मार्केट जवळ आहे. त्यामुळे ते तिकडे टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जातात. आतापर्यंत त्यांनी महिनाभरात जवळपास १३ हजाराहून अधिक टोमॅटो क्रेटची विक्री केली असून त्यातून त्यांना सव्वा कोटी पेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे. त्यांनी एकच दिवशी ९०० क्रेटची विक्री केली त्यातून त्यांनी एकच दिवशी १८लाख रुपये मिळाले आहेत. ते सात वर्षांपासून टोमॅटो लागवड करतात.
गायकर दाम्पत्याला मागच्या महिनाभरात त्यांच्या शेतातील टोमॅटोच्या क्रेटला १००० ते २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.जुन्नर तालुक्यातील टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यानं महिनाभरात बाजार समितीची जवळपास ८० कोटींहून अधिकची उलाढाल झाली आहे. यंदाच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोमुळे लॉटरीच लागली आहे. यामुळे १३ ते १४ शेतकरी हे करोडपती आणि अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. यावर्षी टोमॅटोने शेतकऱ्यांना तारले आहे.
चांगल्या टोमॅटोला नारायणगाव मार्केट येथे सर्वांत उच्चंकी म्हणाजे २५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मालामाल झाला आहे.यंदाच्या वर्षी टोमॅटो बागांची मशागत ,तोडणी, क्रेट भरणे, फवारणी यांचे व्यवस्थापन ईश्वर गायकर आणि त्यांची पत्नी सोनाली गायकर यांनी केले होते. त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन तर चांगले बसलेच पण या टोमॅटोमुळे जवळपास १०० हून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला.त्यांनी तीन ते चार महिन्यांच्या केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे गायकर यांनी सांगितले.


