पारनेर(श्रीकांत चौरे)-
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खर्चाला फाटा देत इर्शाळवाडीतील कुटुंबियांना पारनेर बाजार समितीची १ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री शनिवारी ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इर्शाळवाडी ( रायगड) येथील घटनेतील रुग्णाच्या कुटूंबियांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी रक्कम रुपये.१ लाख किंमतीचा धनादेश आमदार निलेश लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
रायगड जिल्ह्यामध्ये संततधार पावसामुळे इर्शाळवाडीतील अनेक घरांवर डोंगराची दरड कोसळल्याने ती दबली आहेत. तर अनेक रहिवासी बेघर झालेले आहे त्यामुळे सध्या त्यांच्या प्रमुख मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने खारीचा वाटा उचलला असून या इर्शाळवाडी ग्रामस्थांना एक लाख रुपयाची मदत धनादेश देण्यात आला आहे. यावेळी सभापती बाबाजी तरटे यांच्यासह माजी सभापती प्रशांत गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर सभापती योगेश मते उपसभापती बापूसाहेब शिर्के किसन गंधाडे डॉ बाळासाहेब कावरे आबासाहेब खोडदे बाबासाहेब तरटे रामदास भोसले शंकर नगरे अशोक सावंत संदीप सालके विजय पवार किसनराव रासकर भाऊसाहेब शिर्के डॉ पद्ममजा पठारे चंदन रमेश बळगट तुकाराम दत्तू चव्हाण किसन सुपेकर भाऊसाहेब भोगाडे सर मोहन रोकडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इर्शाळवाडी ग्रामस्थांना एक लाख रुपयाची मदत धनादेश आ.निलेश शेळके यांच्याकडे सुपूर्त करताना सभापती बाबाजी तरटे यांच्यासह माजी सभापती प्रशांत गायकवाड व संचालक(छायाचित्र:श्रीकांत चौरे)
- बाजार समितीची लाखाची मदत लाख मोलाची-आमदार निलेश लंके
- सध्या राज्यातील रायगड जिल्ह्यासह इतर ठिकाणी संततधार पावसामुळे दरडी कोसळून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.ईर्शाळवाडीतील अनेक कुटुंबे बेघर झाले असून शासन व प्रशासन पातळीवर त्यांना मदत करण्याचा सर्व तरी प्रयत्न चालू आहे मात्र त्याठिकाणचे धुके असेल किंवा पाऊस असेल यामुळे मदत कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होते. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त व नियोजन मंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यावतीने एक लाख रुपयाची मदत त्यांना देण्यात आलेली ती लाख मोलाची असल्याचे गौरवोद्गार आमदार निलेश लंके यांनी काढले आहे.