आळेफाटा(प्रतिनिधी):रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन च्या अध्यक्षपदी मोहन पाटील भुजबळ,उपाध्यक्षपदी राजेंद्र जाधव व सचिव पदी शिवाजी गोरे यांची निवड करण्यात आली.
आळेफाटा येथील नवजीवन मंगल कार्यालयात झालेल्या पदग्रहण समारंभात माजी अध्यक्ष संपत राहणे यांचे हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना कार्यभार सोपवण्यात आला. यावेळी डॉ.दिलीप पाटील भुजबळ एसआयजी (सीआयडी पुणे), ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, जागतिक सर्पदंश व हृदयरोग तज्ञ डॉ.सदानंद राऊत, पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ.रोहिणी मेहेर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
समाजातील दुर्लक्षीत घटक, ग्रामपंचायत मार्फत सेवा देणारे कर्मचारी यांच्या कार्याचा गौरव म्हणून ग्रामपंचायत आळे, ग्रामपंचायत वडगाव आनंद व आळे पोस्ट ऑफिस मधील ३४ कर्मचाऱ्यांना भेट वस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून जुन्नरचे आमदार अतुल बेनके,रोटरी क्लब चे माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख, माजी प्रांतपाल रवी धोत्रे, एजी सचिन घोडेकर,जीवन शिंदे, गणपत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नव्याने रोटरी मध्ये प्रवेश केलेल्या अरुण औटी,रवी औटी, वृषाली नरवडे, ऍड.आप्पासाहेब गडगे, डॉ. प्रदीप गुंजाळ, डॉ.नागेश हिंगमिरे,सीमा पाटील,संगीता जाधव,अंजू जाधव आदींचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना आमदार बेनके म्हणाले की रोटरीने भविष्यामध्ये दुष्काळाचा विचार करून आपले प्रोजेक्टर राबवावेत. प्रांतपाल रवी धोत्रे यांनी रोटरीच्या कार्याची माहिती देऊन अधिकाधिक लोकांना रोटरीयन्स करावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे नियोजन रो. मोहन जाधव, रो.सुधीर नरवडे रो.राजेंद्र बोऱ्हाडे,गणेश मेहेर,प्रा.अमोल कापसे यांनी केले.यावेळी आळेफाटा,नारायणगाव,जुन्नर,मंचर,
राजगुरुनगर,चाकण,भोसरी आदी रोटरी क्लब चे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन रो.संदीप वाघोले यांनी केले.आभार रो.राजेंद्र जाधव यांनी मानले.