जुन्नर,दि.(प्रतिनिधी)अवकाळी पावसाच्या गारपिटीने रविवारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्या बाबत जुन्नर तालुक्यातील मनसेच्यावतीने तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन दिले.
जुन्नर तहसीलदार कार्यालयात रविवार(दि.२६)रोजी जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने व गारपिटेने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे होणेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जुन्नर तालुकाच्यावतीने तहसीलदार रवींद्र सबनीस यांना निवेदन देताना मनसे पुणे जिल्हा अध्यक्ष मकरंदभाऊ पाटे,पुणे जिल्हा उपाद्यक्ष साईनाथभाऊ ढमढेरे, तालुकाध्यक्ष तानाजी तांबे,उपाध्यक्ष सरपंच दिलीप खिल्लारी, जुन्नर शहर अध्यक्ष अॅड.नंदकुमार चौधरी, विकास मोरे,मनसे दिव्यांग सेनेचे महेंद्र फापाळे,रविराज चाळक, जितेंद्र बाळसराफ,देवराम मामा मनसुख,विक्रांत मनसुख,विनोद राजनकर,कुणाल लेंडे,मंगेश तांबे, मतिन,शिवाजी कुलवडे,पंकज भाटे व सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.