बेल्हेतील २४३ विद्यार्थ्यांची मोफत दंत आरोग्य चिकित्सा

बेल्हे, दि.(प्रतिनिधी)बेल्हे येथील स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं १ शाळेत मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

डॉ.कुंडलिक आव्हाड, डॉ. वैभव साठे, डॉ.सावन पालवे यांच्या उपस्थितीत शिबिर पार पाडण्यात आले. याप्रसंगी शाळेतील २४३ विद्यार्थ्यांची मोफत दंत आरोग्य चिकित्सा करण्यात आली. डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना दातांची काळजी कशी घ्यावी.

दात कसे घासावेत, त्याचबरोबर व्यसनाधीनतेपासून दातांचा बचाव कसा करावा इत्यादी अनेक

गोष्टी प्रात्यक्षिक करुन दाखविल्या. मुलांना इ दातांचे आरोग्य व त्याचे महत्त्व पटवून दिले.

याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर युवा फाउंडेशनचे सदस्य नारायण पवार, नारायण कोकणे, हरकु विलास पिंगट यांनी सर्व मुलांना खाऊ वाटप केले. रसिक गांधी यांनी शाळेला प्रथमोपचार पेटीं भेट दिली.

फाउंडेशनच्यावतीने सर्व डॉक्टरांना तुकारामांचे अभंग गाथा व ज्ञानेश्वरी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक बेलकर व सर्व शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर आदींनी डॉक्टरांचे आभार मानले.