विघ्नहर साखर कारखान्याच्या वतीने शेतकरी विज्ञान प्रदर्शनासाठी रवाना

निवृत्तीनगर(राहुल विधाटे): मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये असलेल्या कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यातील २९० शेतकरी विघ्नहर साखर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रवाना झाले आहेत

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अंतर्गत २२ गट मिळून २९० शेतकरी कारखान्या तर्फे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी चेअरमन सत्यशील शेरकर देवेंद्र खिलारी यशराज काळे तुषार वाबळे धनंजय डुंबरे यांच्या सोबत रवाना झाले आहेत

विघ्नहर सहकारी कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ८ बसेस रवाना करण्यात आल्या आहेत