बेंगलोर(प्रतिनिधी)येथील श्री.श्री रविशंकर यांच्या आश्रमात २२ते २५ फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय आर्ट ऑफ लिवींगसह हरिनाम सप्ताहाचे श्री साई बालजी प्रतिष्ठान मिरजगांवच्यावतीने आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधुत्वाच्या दृढ करण्यासाठी सन २०१३ पासून या सप्ताहाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प.राजेंद्र महाराज गोरे हे करत आहेत.महामंडलेश्वर हभप.काशिकानंद सरस्वती महाराज,भागवताचार्य ह.भ. प.कांतामाई सोनटक्के महाराज,ह.भ.प.दिपालीलाई घोडके,हभप युवराज महाराज देशमुख,आर्ट ऑफ लियींग चे जेष्ट शिक्षक राजेंद्र राऊन यांच्या उपस्थितीत वैदिक धर्म संस्थानचे प्रमुख स्वामी हरिहना व स्वामी विश्वरूपण यांचे हस्ते प्रारंभ झाला.
दररोज पहाटे काकडा आरती,विष्णुसहस्यमाम हरीपाठ व हरीकिर्तन तसेच राजेंद्र राऊन यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद अनुभुती कार्यक्रम घेण्यात आला.दररोज गुरुदेव श्रीश्री रविशंकर यांचा सत्संगाचाही भाविकांना लाभ झाला.या सप्ताहात महामंडलेश्वर काशिकानंद सरस्वती, ह.भ.प.दिपालीताई घोडके,हभप युवराज महाराज देशमुख यांची कीर्तनसेवा तर भागवताचार्य कांतामाई सोनटक्के यांचे काल्याचे किर्तन झाले.दरम्यान गुरुदेव श्री. श्री रविशंकर यांच्या हस्ते दहिहंडी फोडून सप्ताहाची सांगता झाली.
सप्ताह काळात उपस्थितिताना ध्याणधारना कशी करावी हे शिकवण्यात आली.या सप्ताहात सौरभभाऊ बोरा, शंकरशेठ नेवसे,अतुलशेठ बोरा,सुवेंद्र गांधी या प्रमुख अतिथीची उपस्थिती होती.हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राजु बगाडे,सोनी गुलठी,लकी गुलदी,संभाजी छगई खेतमाळस,सुदाम गोरख,संपतराव बावडकर पाटील,बहुनाला सिरसागर,डी.दिगंबर पुराणे, राजेंद्र गांगर्डे,बजरंग साठ,अशोक माने, अरविंद पारखणे, रामचंद्र केल्ले,डॉ.युवराज कांबळे,साहेबराव मार्ने पप्पू जाणे, सुरेशराव सरकर,गणेश तरटे,संदिप बुधीवत,निलेश कुलकर्णी कोलीवाल पुराणे, प्रकारा चेडे प्रमोद बगाहे आजिनाथ कोल्हे, सौ मीराताई शंकरराव शेंडे,डिंपूशेठ नंदे, प्राचार्य डॉ.रामदास बिटे,राहलयोह गोविंदराव सोनमाळी यांनी अमपरिधर हम,दादासाहेब जवणे,संदिप केदारी, प्रा. राजळे यांनी परिक्षम घेतले.