निमगावसावा : पुणे व अहिल्यानगर जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या बेल्हे (ता.जुन्नर) येथील श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची प्रगती ही सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी असून विविध शाखांच्या माध्यमातून बेल्हे व पंचक्रोशीत सहकाराचे भक्कम जाळे उभे राहिले आहे, असे प्रतिपादन मा.आ.अतुल बेनके यांनी केले.

निमगावसावा येथे श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्याने सुरू झालेल्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.या शाखेचे उद्घाटन ह.भ.प. राजाराम महाराज जाधव यांच्या हस्ते झाले.जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार,पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, खरेदी-विक्री संघाचे पांडुरंग गाडगे, युवा नेते वैभव काळे, ह.भ.प.विजय महाराज खाडे, गजानन घोडे, शहेनाज इनामदार, सुभाष कवडे, संभाजी चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी अध्यक्ष सदाशिव बोरचटे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी प्रास्ताविकात संस्थेची वाटचाल मांडून निमगावसावा येथील ही सातवी शाखा असल्याचे सांगत लवकरच रांजणी व कवठे यमाई येथे नवीन शाखा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला.

दरम्यान “स्व. वल्लभशेठ बेनके यांच्या कार्यकाळात जुन्नर तालुक्यात सहकार चळवळ भक्कम झाली. आज तालुक्यात २०० हून अधिक पतसंस्था कार्यरत असून त्यामध्ये साईकृपा पतसंस्था ठेवीदारांचा विश्वास जपणारी व आदर्श संस्था म्हणून ओळखली जाते.”असे बेनके यांनी सांगितले.

कार्यक्रमात राजेंद्र औटी, स्नेहल शेळके, वल्लभ शेळके, विठ्ठलशेठ गुंजाळ, पाराजी बोरचटे, रामदास गुंजाळ, मनूआप्पा पिंगट, गोट्याभाऊ वाघ, राजेंद्र पिंगट, प्रकाश चव्हाण,लहू गुंजाळ,बडू गटकळ यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊ थोरात, प्रास्ताविक सावकार पिंगट यांनी केले तर आभार अध्यक्ष सदाशिव बोरचटे यांनी मानले.

साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निमगावसावा शाखेच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर
(छाया-सुरेशभुजबळ)