पारनेर : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच छगनराव भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, पारनेर तालुका व ग्रामस्थ चोंभूत यांच्या संयुक्त विद्यमाने समता परिषदेच्या शाखेचे उद्घाटन आणि मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, तालुकाध्यक्ष नवनाथ खामकर आणि शहराध्यक्ष बबन चौरे यांनी महात्मा फुले यांचे समतावादी विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.चोंभूत शाखेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती, शैक्षणिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मच्छिंद्र माळी यांच्या पुढाकारातून आयोजित नेत्रतपासणी शिबिरात नागरिकांची तपासणी करण्यात आली.मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या पात्र रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच दत्ता म्हस्के, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष खाडे, शाखाध्यक्ष आकेश जमदाडे,ग्रामपंचायत सदस्य प्रणल भालेराव, अनिल गाडीलकर, समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय पथक आणि ग्रामस्थ उपस्थित होते