बेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत ५६ उमेदवार आजमावणार आपलं नशीब

बेल्हे(सुरेश भुजबळ):बेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत सतरा सदस्य जागासाठी ५२ उमेदवार रिगणात राहिले.सरपंच पदासाठी चार उमेदवार रिगणात राहिले,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर राठोड यांनी दिली. 

बेल्हे ग्रामपंचायत सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलासाठी राखीव असून या जागेसाठी चार उमेदवार महिला निवडणुकीच्या रिंगणात आहे. 

सरपंच पदासाठी संगीता विजय घोडके, मनीषा जाणकू डावखर,वैशाली मोहन मटाले,गंगुबाई सखाराम मूलमुले हे उमेदवार रिगणात आहेत.ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण सतरा जागांसाठी ५२ उमेदवार निवडणूक रिगणात आहेत.

बेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग एकमध्ये तीन जागेसाठी लढत असून समीर गोरक्षनाथ गायकवाड,बबन रामचंद्र औटी,अरुण आप्पाजी बांगर,रोहिणी रमेश औटी,दीपाली संजय मटाले, अर्चना नवनाथ यादव,अनिता देविदास पिंगट,मीरा सोपान पिंगट,पल्लवी ज्ञानेश्वर पिंगट असे उमेदवार रिंगणात आहेत.या प्रभागात ७४१ पुरुष-७४८ स्त्री असे एकूण १४८९ मतदार हक्क बजावणार आहेत. 

प्रभाग दोन मध्ये तीन जागेसाठी लढत असून संतोष महादू चाटे,राजेंद्र बबन पिंगट,स्वप्निल खंडू पिंगट, अन्याया मंगेश तपासे,सिधु नामदेव वाकचोरे,पूजा अल्पेश सोनवणे,कैलास बाबाजी आरोटे,किसन भाऊसाहेब देशमुख,अक्षय शशिकांत वाघ असे उमेदवार आहेत.या प्रभागात पुरुष ६७७-स्त्री ६२३ असे एकूण १३०० मतदार हक्क बजावणार आहेत.

प्रभाग तीनमध्ये दोन जागेसाठी लढत असून सुभाष कृष्णा भुजबळ,सूरज प्रकाश जाधव,नवनाथ बाबुराव शिरतर,अर्चना विनायक शिंदे,सुरेखा अमर बांगर,पल्लवी स्वप्निल भंडारी असे उमेदवार आहेत. या प्रभागात पुरुष ४२५-स्त्री ३९५ असे एकूण ८२० मतदार हक्क बजावणार आहेत.

प्रभाग चारमध्ये तीन जागेसाठी लढत असून पियुष पाराजी बोरचटे,विक्रम धोंडिभाऊ पिंगट,नाजीम नाशिर बेपारी,कमल गजानन घोडे,दीपाली सतीश डावखर,सीमा मंगेश गुंजाळ,कमल सोमनाथ गुंजाळ,मंदाकिनी रमेश नायकोडी,बेबी ज्ञानेश्वर पोपळघट असे उमेदवार आहेत.या प्रभागात पुरुष ५६४ तर स्त्री ५७८ असे एकूण ११४२ मतदार हक्क बजावणार आहेत.

प्रभाग पाचमध्ये तीन जागेसाठी लढत असून वंदना संतोष पाबळे,मीराबाई यशवंत भालेराव,विद्या अजिंक्य भालेराव,वैशाली राकेश डोळस,सिधु बाळू औटी,योगिता नितीन बांगर,मोहन बंशी मटाले,जावेद माशुम बेपारी,नाजीम गुलाब बेपारी असे उमेदवार आहेत.या प्रभागात पुरुष ४५५-स्त्री ४४१ असे एकूण ८९६ मतदार हक्क बजावणार आहेत.

प्रभाग सहामध्ये तीन जागेसाठी लढत असून गोरक्षनाथ बबन डावखर,प्रकाश रामचंद्र डावखर,किरण तान्हाजी गुंजाळ,विकास निवृत्ती गुंजाळ,रोहिणी पंढरीनाथ बांगर,शारदा धनंजय बांगर,कांचन संतोष कणसे,संतोष विलास पाबळे, ताराचंद लक्ष्मण मूलमुले,पांडुरंग कोंडीबा पिंगट असे उमेदवार आहेत.या प्रभागात पुरुष ५६२- स्त्री ६११ असे एकूण ११७३ मतदार हक्क बजावणार आहेत.

या निवडणुकीत पुरुष ३४७३ तर स्त्री ३३४७ असे एकूण ६८२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीचे  मतदान रविवार दि.५ रोजी होणार असल्याचे निकाल सोमवार दि.६ रोजी जाहीर करण्यात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर राठोड यांनी सांगितले.