नगर-येथील शनी गल्लीतील स्वामी विवेकानंद चौक येथील भक्ताची देवी मंदिरात नवरात्रोत्सव निम्मिताने दररोज दर्शनाला गर्दी होत आहे नवरात्रीत पंचमीला भोंडला खेळण्याची पद्धत या मंदिरात आहे .त्याप्रमाणे महिलांनी पंचमीला भोंडला खेळला
नवरात्रीत पंचमीला भोंडला खेळण्याची पद्धत या मंदिरात अजूनही सुरु आहे.अष्टमीच्या दिवशी या मंदिरात भळंदाचा कार्यक्रम असतो.या दिवशी देवीचे भक्त मंदिरात येतात भळंद पेटवतात पुढे घागर फुंकण्याचा कार्यक्रम होतो.नवमीला नवचंडी यागाचा आयोजन केले जाते.शहरात भक्ताच्या देवीचं आणि जेलरोड देवीचं मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे .भक्ताच्या देवीचं मंदिरं हे ३०० वर्षांपासून प्रसिद्ध आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरु होणा-या नवरात्री उत्सवास जितके महत्व आहे तितकेच महत्व आश्विन पक्षात हस्त नक्षत्रापासून सुरु होणा-या ‘भोंडला’ सणास आहे. पूर्वीच्या काळी महिलांनी चूल आणि मूल या पलीकडे काही जगच नव्हते.अशा वेळी या सणाच्या निमित्ताने महिला आपल्या सखींना भेटून एकमेकींच्या सुख दु:ख वाटायच्या. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने भोंडला खेळला जातो, विशेषतःपश्चिम महाराष्ट्रात या खेळाला हादगा म्हणूनही संबोधले जाते.विदर्भात या भोंडल्याला भुलाबाई असेही म्हटले जाते. अशा या सणाला आश्विन हस्त नक्षत्रात फार महत्व आहे.
भोंडल्याचा या कार्यक्रम महिलांपेक्षा जास्त मुलींसाठी फार विशेष असतो.भोंडल्याचा हा खेळ सुरु करण्यापूर्वी मुली एका पाटावर हत्तीची रांगोळी काढून वा चित्र काढून त्याभोवती फेर धरतात.त्यानंतर ऐलमा पैलमा या गाण्याने पारंपारिक गाणी म्हणत फेर धरले जातात.या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र लावले जाते.घाटावर कुमारिका पाटावर डाळ तांदूळ किंवा धान्याने हत्ती काढतात.हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो त्यामुळे त्याची पूजा करुन घरात समृद्धी येते असा यामागील विश्वास आहे.
ऐलमा पैलमा गणेश देवा पासून गणेशाला वंदन करून मग एक एक करत चिडवणारी, टेर ओढणारी किंवा खिरापतीची मागणी करणारी गाणी गायली जातात आणि मग आड बाई आडोणी या गाण्याने या खेळने भोंडल्याची सांगता करतात.पूर्वीच्या काळी स्त्रियांना आपल्या रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून अशा प्रकारचे सण उत्सव साजरे केले जात होते.सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात खेळणाऱयांची संख्या कमी होत आहे तर अलीकडे या परंपरेचा वारसा जपण्यासाठी अनेक ठिकाणी मंदिरात सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
फोटो-नवरात्रोत्सव निम्मित नगर मधील भक्ताची देवी मंदिरात महिलांनी व मुलींनी भोंडला सादर केला यावेळी मोठ्या संख्नेने महिला उपस्थित होत्या(फोटो-महेश कांबळे)