नारायणगाव(प्रतिनिधी): ग्रामोनत्ती मंडळाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ३६ महा.बटालियन अंतर्गत २३ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संस्थात्मक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नरचे १०० कॅडेट्स रा.प. सबनीस विद्यालयातील १०० कॅडेट्स,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील १०० कॅडेट्स असे ३०० कॅडेट्सचा कॅम्प आहे.
त्यातील आजचा प्रथम दिवस या दिवशी 36 महा.बटालियन चे नायब सुभेदार गुरमेज सिंग,हवालदार सुखबीर सिंग व ग्रामोनत्ती मंडळाच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी,हिंदी विभाग प्रमुख डॉ.अनिल काळे,भूगोल विभाग प्रमुख डाॅ. काफळे,इतिहास विभाग प्रमुख डाॅ.पठारे,मराठी विभाग प्रमुख डॉ. कसबे,इंग्रजी विभागाचे डाॅ. विनय कुटे,मानसशास्त्र विभाग प्रमुख ए.एन.ओ.कॅप्टन डॉ.दिलीप शिवणे,गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यालयाचे ए.एन.ओ.रोहीत भागवत,श्रीशिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर चे डाॅ. बाबासाहेब माने व प्रमुख उपस्थिती डाॅ. प्रतिक मुंगेकर या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय आर्मी अटॅचमेंट कॅम्प औंध मध्ये जे विद्यार्थी बारा दिवस कॅम्प करून आले त्यामध्ये जूनियर अंडर ऑफिसर किरण नेहरकर, जूनियर अंडर ऑफिसर आदित्य गायकवाड,सार्जंट विजय वायकर, कार्पोरल तेजस खोपडे, कॅडेट सोमनाथ बोरकर, सीनियर अंडर ऑफिसर ज्ञानेश्वरी भोर,कार्पोरल साक्षी गायकवाड, कॅडेट गौरी पिंपळे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्यामध्ये छात्रसेनेतील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी भोर व गौरी पिंपळे यांनी कॅम्प मधील स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्या छात्र सेनेतील विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला.
त्यानंतर ग्रामोन्नती मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आनंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्यानंतर 36 महाराष्ट्र बटालियनचे नायब सुभेदार गुरमेज सिंग यांनी होणाऱ्या पाच दिवसाच्या प्रशिक्षण (कॅम्प) बद्दल माहिती दिली.त्यामध्ये सिंग यांनी एनसीसी च्या कॅडेट्सना भारतीय सैन्य इतिहास, विविध सैनिकी सेवांची माहिती, एनसीसी ची प्रशासनिक रूपरेखा, व्यक्तित्व विकास, प्रथमोपचार, भारताचा भूगोल, इतिहास, भारतातील प्रमुख धर्म व त्यांचे पवित्र धर्मग्रंथ, फिल्ड इंजिनियरिंग, फिल्ड सिग्नल्स, सेक्शन फार्मेशन, पेट्रोलिंग, आंबूस, दुरीचा अंदाज लावणे, मॅप रीडिंग, लीडरशिप, सुरक्षा व बचाव इत्यादी विषयांची विस्तृत माहिती दिली.
तसेच शस्त्राची टेक्निकल माहिती,शस्त्र चालवणे, शस्त्रासोबत कावायाद करणे,खाली हात ड्रिल, सामने सेल्यूट, दहिने सॅल्यूट, बाये सॅल्यूट, तेज चाल इत्यादीचा प्रत्यक्ष अभ्यास करून घेतला. 7.62 mm SLR व 0.22 रायफल यांचे खोलणे व जोडण्याचा देखील प्रत्यक्ष अभ्यास कॅडेट्सकडून या 5 दिवसात करून घेण्यात येणार आहे.
डॉ.प्रतीक मुणगेकर यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल व जीवनात संघर्ष कशा प्रकारे केला पाहिजे याची सर्व छात्र सेनेतील विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांना जीवनात संघर्ष करण्यासाठी उत्स्फूर्त केले.कार्यक्रमाचे नियोजन कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील ए.एन.ओ. कॅ.डाॅ. दिलीप शिवणे यांनी केले.