आळेफाटा(प्रतिनिधी)वडगांव आनंद(ता.जुन्नर)हद्दीत मोरदरा शिवारात एका बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयितरित्या आढळून आला.त्याचा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
आळे(ता.जुन्नर)येथील हॉटेल फाऊटनमागे वडगांव आनंद गावच्या हद्दीत मोरदरा रस्त्यालगत रविवारी(दि.११)एका अनोखी पुरुष जातीच्या इसमाचा मृतदेह आढळून आला होता.तो मृतदेह आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी आणले त्यावेळी त्या मृतदेहाची नातेवाईकांना ओळख पटली.मयत व्यक्तीच्या डोक्याला टनक हत्याराने मारल्याने डोक्याला खोलवर जखमा झाल्या,कवटीच्या हाडाचा चक्काचूर झाल्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्याच्या मृत्यूस धारदार हऱ्याराचा मार कारणीभूत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
हा मृतदेह वडगाव आनंद(ता.जुन्नर)येथील कैलास महादू भंडलकर(वय ३२,राहणार मोरदरा)या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले.मयत कैलास’ची पत्नी नाजूका भंडलंकर हिने फिर्याद दिली.
आळेफाटा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर करीत आहेत.