जुन्नर:प्रतिनिधी:-घंगाळदरे(ता.जुन्नर)येथे,कौटुंबिक वादातून बायकोचा निघृण खून करून जंगलात फरार झालेल्या शंकर बांबळे या पतीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अखेर महिन्याभराने पकडून अटक केली.
दरावस्ती घंगाळदरे(ता.जुन्नर)येथे,शंकर बारकु बांबळे याचा पत्नी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत कौटुंबिक वादातून भांडण झाले.या भांडणात शंकर बांबळे याला राग अनावर झाल्याने त्याने अलका बांबळे हिच्यावर धारधार कोयत्याने वार करत तिचा खून केला.खून झाल्या नंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी,आंबे हातवीज,आहुपे घाटमाथा जंगलामध्ये पळून गेला.खून झाल्यापासून हा आरोपी जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता.
जुन्नर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं कलम१०३(१),११५(२), ३५२,३५१(२),३(५)नुसार दि.२१मार्च २०२५ रोजी दाखल होता.
गुन्हे शाखेच्या सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना आरोपी शंकर बांबळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगल घाट परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार दीपक साबळे,पोलिस हवालदार राजु मोमीन,संदीप वारे,अक्षय नवले या गुन्हे शाखेच्या पथकाने आहुपे जंगल परिसरात आरोपीचा शोध घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले.