वडगाव आनंद येथे “कलादर्पण २०२६” सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

आळेफाटा:-विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारे रंगतदार कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या बहुआयामी कलागुणांमुळे यंदाचा सोहळा विशेष अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते डी.बी.वाळुंज यांनी प्रास्ताविक केले, तर छाया डुंबरे यांनी सूत्रसंचालनाची धुरा समर्थपणे सांभाळली.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य मंगेश अण्णा काकडे, माजी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, सरपंच रेलिका जाधव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तानाजी देवकर तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.