पारनेर(श्रीकांत चौरे)-
मांडवे सारख्या गावाला सोमनाथ आहेर सारखा उच्चशिक्षित सरपंच मिळाल्याने त्याचा फायदा गावाला मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सरपंच सोमनाथ आहेर यांनी तन-मन-धनाने मांडवे खुर्द गावाच्या शिक्षण आरोग्य पाणी वीज या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत माध्यमातून प्रयत्न केला आहे त्यामुळे सरपंच सोमनाथ आहेर
यांच्यामुळे मांडवे गावचा चेहरा मोहरा बदलला असल्याचे गौरवोद्गार आमदार निलेश लंके यांनी काढले आहे.मांडवे खुर्द येथे १ कोटी २ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार निलेश लंके व प्रतापराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जि.प.चे माजी सभापती प्रतापराव शेळके माजी सभापती प्रशांत गायकवाड सुदामराव पवार बाजार समिती संचालक अशोक कटारिया गुरुदत्त मल्टिस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ.झावरे प्रा. संजय लाकूडझोडे सर राहुल झावरे बाळासाहेब खिलारी जगदीश पाटील गागरे भागुजी दादा झावरे सरपंच प्रकाश गाजरे अनिल गंधाक्ते बाळासाहेब लंके शरद रोकडे सत्यम निमसे ग्रामपंचायत सदस्य गौतम बागुल माजी सरपंच जगदीश गागरे ,सौ पुजा गागरे सौ रेशमा गागरे सौ कमल गागरे विठ्ठल जाधव, यशवंत जाधव, पांडुरंग जाधव ,नामदेव गागरे ,रेवणनाथ गागरे दिनकर दादा जाधव, विनायक जाधव पाटील, रावसाहेब पाटील गागरे, यशवंत जाधव, धावळू बागुल ज्ञानदेव आहेर, विठ्ठल गागरे. सुधीर जाधव, रेवणनाथ गागरे, रावसाहेब तुळशीराम गागरे, कृष्णा पैलवान, बाळासाहेब जाधव, संतोष बागुल , कैलास दादा गागरे, मच्छिंद्र बर्डे, गणपत गागरे, नामदेव गागरे यांच्याासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की सरपंच सोमनाथ आहेर यांच्या वाढदिवसानिमित्ताने जवळ
पास १ कोटी २ लाख रुपयांच्या विकास कामास शुभारंभ करून गावाला विकास कामांचे गिफ्ट दिले आहे. तर वाढदिवसाच्या अवचित साधून रक्तदान शिबिरासह इतर सामाजिक कामाचे आयोजन करून सरपंच आहेर यांना सामाजिक भान असल्याचेही आमदार निलेश लंके म्हणाले. याबद्दल सुद्धा सरपंच आहेर यांच्या माध्यमातून गावातील विविध विकास कामांसाठी जवळपास कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा मूलभूत सुविधांसाठी निधीची कमतरता पडून देणार नाही असे सुद्धा आमदार निलेश लंके यांनी दिले आहे.
- मांडव्यात साकारली देखणी प्राथमिक शाळा.. माजी सभापती प्रतापराव शेळके
- मुळा नदीच्या कडेला असलेल्या पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेची आदर्श व देखील अशी इमारत उभी राहिली आहे. मालेगावचे सरपंच सोमनाथ आहेर यांनी यासाठी निधी मिळावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावाही केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे टाकळी ढोकेश्वर गटात व पारनेर तालुक्यातही एवढी देखणी व निसर्गचित्रांनी सजलेली नटलेली ईमारत उभी राहिली आहे. त्यामुळे माझ्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या इमारतीला मंजूर मिळाली असून याची मला समाधान असल्याचे मत जि प चे माजी सभापती प्रतापराव शेळके यांनी व्यक्त केले आहे.