बेल्हे,दि.(प्रतिनिधी)मुबई-विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर बेल्हे येथे,लांब पल्याच्या एसटी बसेस गावा बाहेरून बाहय वळणावरून धावत असल्याने,प्रवाशाच्या सुरक्षितता विषय ऐरणीवर येत असताना एसटी महामंडळा चे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
बेल्हे बाह्यवळण रस्ताच एसटी महामंडळाच्या बसेससाठी अधिकृत वाहतुकीचा नसल्याने बाह्यवळण रस्त्यावर एखादी अपघात किंवा दुर्घटना झाल्यास त्यास जबाबदार कोणाला धरणार असा प्रश्न जानकर ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे.

बेल्हे आठवडे बाजार दिवशी सर्वच एसटी चालक-वाहक गावात गाडी घालण्याऐवजी गावाबाहेर दोन किलोमीटर बाहय वळणावरून धावत असल्याने,एकीकडे परिसरातले प्रवाशी एसटी ऐवजी खाजगी अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यातून प्रवास करतात,त्यातून एसटी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.तर दुसरीकडे बाह्यमार्गापासून बेल्हे गावठाणापर्यत ये-जा करताना धूम स्टाईलने चोरटे महिलांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
दरम्यान बेल्हे परीसर बिबटया प्रवण क्षेत्र घोषित असल्याने परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची कमालीची दहशत आहे. बाह्यवळण ते बेल्हे गावठाण प्रवाशाना ये-जा करताना बिबट्याच्या भीतीमुळे जीव मुठीत धरून जावं लागतं आहे.
एसटीच्या बसेस गावातून आल्यास एसटी महामंडळा चे प्रति दिवसाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार नाही,एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी याविषयी दक्षता घेणे,आवश्यक आहे अशी बेल्हे ग्रामस्थाची भूमिका आहे.
एसटी महामंडळाच्या लांब पल्याच्या बस बेल्हे सारख्या पंधरा हजार लोकसंख्या तसेच चाळीस गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गावात एसटी बस थाबणे,गावात येणे अपेक्षित असताना,चालक-वाचकांच्या मनमणीपणामुळे त्या गावाबाहेरील बाहय वळणावरूनच सुसाट निघून जात आहेत.
दरम्यान बेल्हे परिसरात बिबटयाचा असलेला मुक्त संचार आणि बिबट्याच्या हल्ल्यामुळे बिबट्याची मोठी दहशत आहे.परिसर बिबटया प्रवण क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केला असल्याने,त्याची दक्षता नागरिक घेत असले तरी,एसटी महामंडळाचे चालक-वाहक प्रवाशांना बिबटयाला आयते सावज देत असल्याचे बोलले जात आहे.